Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

नवी दिल्ली : Petrol Diesel Price Today | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने देशातील नागरिकांना संकटात टाकले आहे. यामुळे महागाई सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकार वाढ करत आहे. देशातील अनेक शहरात सध्या पेट्रोलचा दर 120 लीटरच्या जवळ पोहचला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 17 पेक्षा जास्त वेळा इंधनाचे (Petrol Diesel Price Today) दर वाढले आहेत.

दररोज होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दराने (Petrol – Diesel Price) आता सर्व विक्रम मोडले आहेत.

या शहरात पेट्रोल 120 रूपयांच्या जवळ :

– श्रीगंगानगर, राजस्थान पेट्रोल 119.05, डिझेल 109.88 रुपये प्रति लीटर.

– अनूपपुर, मध्यप्रदेश पेट्रोल 118.35, डिझेल 107.50 रुपये.

– सतना, पेट्रोल 120 रुपयांच्या पुढे, डिझेल 105.67 प्रति लीटर.

– अलीराजपुरमध्ये सुपर पेट्रोल 120 रुपये लीटर, डिझेल 105.51 प्रति लीटर.

– रिवा, मध्यप्रदेश पेट्रोल 117.95 प्रति लीटर, डिझेल 107.14.

– बुरहानपुर, मध्यप्रदेश 117.34 प्रति लीटर, डिझेल 106.58.

– छिंदवाडा, मध्यप्रदेश 117.56 प्रति लीटर, डिझेल 106.76.

देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर  

– दिल्ली-पेट्रोल 106.89 रुपये, डिझेल 95.62 रुपये प्रति लीटर

– मुंबई पेट्रोल 112.78 रुपये, डिझेल 103.63 रुपये प्रति लीटर

– चेन्नई पेट्रोल 103.92 रुपये, डिझेल 99.92 रुपये प्रति लीटर

– कोलकाता पेट्रोल 107.44 रुपये, डिझेल 98.73 रुपये प्रति लीटर

हे देखील वाचा

Pune News | ‘सगळे चोर आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे’, राजू शेट्टींचा सर्वपक्षीय कारखानदारांवर निशाणा

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Petrol Diesel Price Today | petrol reached rs 120 for the first time in india check your city price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update