Petrol Diesel Price : पुन्हा एकदा डिझेलच्या किमतीत ‘कमाली’ची झाली वाढ, जाणून घ्या पेट्रोलचे आजचे दर

नवी दिल्ली : देशात लागोपाठ वाढत असलेले पेट्रोल-डिझेलचे दर आठ दिवस स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर पुन्हा वाढवले आहेत. डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 87.19 रूपये प्रति लीटर आहे तर डिझेल 79.05 रूपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. यापूर्वी, जून महिन्यात लागोपाठ 22 दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 87.19 – 79.05
पुणे 87.57 – 78.01
ठाणे 86.78 – 77.22
अहमदनगर 87.31 – 77.97
औरंगाबाद 87.62 – 78.26
धुळे 87.08 – 77.55
कोल्हापूर 87.32 – 77.79
नाशिक 87.02 – 77.48
रायगड 86.89 – 77.32

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मागील काही दिवसांपासून अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलामध्ये तेजी आली आहे. ज्याचा परिणाम स्थानिक बाजारातील इंधनाच्या किंमतींवर दिसून येत आहे. ग्लोबली इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अंतरराष्ट्रीय मीडियात अशा बातम्या येत आहेत की, इस्त्रायलने जोरदार सायबर हल्ला करून इराणच्या अणू ठिकाणांवर दोन स्फोट केले आहेत. या बातमीचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता