Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. अमेरिकन क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.43 टक्केची घसरण झाल, ज्यानंतर ते 40.60 डॉलर प्रति बॅरलवर आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात सुद्धा शुक्रवारी घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव 1.13 टक्केच्या घसरणीसह 42.85 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. दुसरीकडे, नॉर्वेच्या ऑईल अँड गॅस असोसिएशन आणि मजदूर यूनियनमधील चर्चा निष्फळ झाल्यानंतर नॉर्वेजियन ऑफशोर ऑईल आणि गॅस क्षेत्रांना मागच्या दिवसांत बंद केले होते. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीला समर्थन मिळाले. याचा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने स्थानिक बाजारांवर परिणाम झाला.

आज लागोपाठ 8 व्या दिवशी स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शनिवारी सुद्धा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढील प्रमाणे…

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           87.74 – 76.86
पुणे             87.40 – 75.40
ठाणे           87.31 – 75.28
अहमदनगर 88.32 – 76.30
औरंगाबाद  88.12 – 76.10
धुळे           88.30 – 76.28
कोल्हापूर   87.98 – 75.98
नाशिक     88.15 – 76.12
रायगड      87.40 – 75.37

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता