मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून ‘पेट्रोल-डिझेल’ प्रतिलिटर 50 पैसे ते एक रुपया ‘महाग’ होऊ शकतं

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एप्रिल महिन्याच्या सुरुवातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये एक रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. कारण देशामध्ये BS-6 कार्यप्रणालीचा वापर सुरु होणार आहे. सध्या देशात BS-4 वाले इंधन वापरले जाते. सरकारने वाहनांमधून निघणारे कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनांमध्ये एप्रिल पासून BS-6 इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांतून वाहणारे प्रदूषणाचे प्रमाण राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे असे मानले जाते.

एक एप्रिल पासून BS-6 मानदंडासह असेल पेट्रोल – डिझेल
इंडियन ऑइलचे चेअरमन संजीव सिंह यांनी सांगितले की, सर्व कंपन्यांनी बीएस 6 वाल्या इंधनाची विक्री सुरु केली आहे. तसेच एक एप्रिल पासून देशात बीएस 6 वाले इंधन असेल असे देखील त्यांनी सांगितले. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 73.36 रुपये व 66.36 रुपये प्रति लीटर इतका आहे.

17 हजार कोटींची झाली गुंतवणूक
आयओसीने स्वच्छ इंधन निर्मितीसाठी रिफायनरीज सुधारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर या उद्योगाने सुमारे 30,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. ते म्हणाले, आम्ही एप्रिलपासून बीएस-6 इंधन पुरवठ्यावरील परिणामांचे आकलन करीत आहोत.

50 पैसे ते एक रुपये प्रति लिटरने वाढू शकतात दर
सिंह यांनी सांगितले की, बीएस-6 हे आधीच्या इंधन प्रणालीपेक्षा महाग असणार आहे. किमतीमध्ये किती वाढ होणार यावर विचार केला जात असल्याचे देखील सिंह यांनी सांगितले. तरी इंधन वाढ ही 50 पैसे ते एक रुपये प्रति लिटर इतकी केली जाऊ शकते असे देखील सिंह यांनी स्पष्ट केले.

बीएस-6 हे इंधन अती स्वच्छ इंधन आहे. यामध्ये सल्फरचे प्रमाण प्रति मिलियन (10 लाख) (पीपीएम) प्रति 10 अंश इतके आहे. बीएस-6 चे डिझेल हे तर सीएनजी प्रमाणे किंवा त्यापेक्षाही अधिक चांगले आहे.