Petrol Diesel Price : जाणून घ्या आज किती रूपये लीटरने विकले जात आहे तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ दोन दिवस झालेल्या वाढीनंतर कालपासून शांतता आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

गुरुवारी पेट्रोलच्या दरात 23 पैसे प्रति लीटर आणि डिझेलमध्ये 26 पैसे प्रति लीटरची वाढ झाली होती. ज्यानंतर पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर पोहचले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारला पेट्रोल-डिझेलच्या उच्च किंमतीत दिलासा देण्याची शिफारस केली आहे. मंत्रालयाने उत्पाद शुल्कात कपात करून जनतेला दिलासा देता येईल, असे म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 90.83 – 81.07
पुणे 90.60 – 79.63
ठाणे 90.42 – 79.43
अहमदनगर 90.78 – 79.81
औरंगाबाद 91.22 – 80.23
धुळे 91.14 – 80.16
कोल्हापूर 90.84 – 79.89
नाशिक 90.74 – 79.77
रायगड 90.55 – 79.56

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

असे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता