Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Prices Today | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शनिवारी इंधन करकपात (Tax Deduction) केल्याने नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे नागरीकांची दैना होत आहे. आता कर कपातीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices Today) घट झाली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. असं असलं तरी ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात.

 

जाणकारांच्या मतानुसार, ग्लोबल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा दर आज (सोमवारी) 113 डॉलर प्रति बॅरल जवळ पोहोचला आहे. यापुर्वीच जर कच्च्या तेलाचा दर वर गेल्यास कंपन्यांना पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅटमध्ये (VAT) कपात केल्यानंतर इंधन भाव कमी झाला. मात्र, आता पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांना भाव वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (Petrol-Diesel Prices Today)

 

केंद्रापाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) देखील रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला आहेे. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात 2 रुपये 08 पैसे, तर डिझेलवरील करात 1 रुपया 44 पैसे कपात केली आहे. यामुळे सध्या मुंबईत (Mumbai) पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 7.16 रुपये आणि डिझेलचा दर 7.49 रुपयांनी कमी झाला आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दर (Petrol-Diesel Prices) तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकणार आहात.
तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दराबद्दल देखील जाणून घेऊ शकणार आहात.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळणार आहे.

 

Web Title :- Petrol-Diesel Prices Today | petrol and diesel price may rise again check todays 23 may 2022 rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा