Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Prices Today | गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा भाव (Crude Oil Prices) पुन्हा 112 डॉलर प्रति बॅरल नजदीक पोहोचला आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. मात्र आज (सोमवार) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत.

 

क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो. या आधीच किमती वाढू शकतात असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे. ब्रेंट क्रूडचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. असं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या कच्च्या तेलाचा भाव वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. (Petrol-Diesel Prices Today)

 

SMS च्या माध्यमातून जाणून घ्या दर –

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.

 

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 16 may 2022 know latest rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा