Petrol Diesel Rate | 9 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या, ठाकरे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मोदी सरकारने (Modi Government) प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर डिझेल मागे 10 रुपये कमी (Petrol Diesel Rate) केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate) उतरल्या आहेत. आता देशातील राज्यांनी आपल्या व्हॅट करात कपात (VAT deduction) करावी असंही आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. केंद्राच्या आवाहनाला भाजप शासित 9 राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता ठाकरे सरकार यावर काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

केंद्र सरकारच्या या आवाहानाला उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये
कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यांनी व्हॅट कपात केली आहे.
त्यापैकी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa), उत्तराखंड (Uttarakhand), गुजरात (Gujarat) आणि मणिपूर (Manipur)
या पाच राज्यात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका (Assembly elections) होणार आहेत.

 

या पाच राज्यात पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होत असल्याने या भाजप शासित राज्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये
कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे.
इंधन दर कपातीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा विरोधक आरोप करीत आहेत.
केंद्र सरकारने आणि 9 राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरच्या करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) तशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

 

Web Title : Petrol Diesel Rate | petrol diesel rate nine states cut petrol diesel prices all eyes on maharashtra governments role

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Taapsee Pannu | ‘बॉलिवडूचे अनेक अभिनेते माझ्यासोबत…’, अभिनेत्री तापसी पन्नूचे अत्यंत खळबळजनक वक्तव्य

Post Office Monthly Income Scheme | फायद्याची गोष्ट ! एकरकमी जमा करा ‘एवढी’ रक्कम, दरमहिना 2475 रुपयांची होईल ‘कमाई’; जाणून घ्या

Mandira Bedi | ‘मंदिरा’नं पतीच्या आठवणीत शेअर केली ‘ही’ पोस्ट; काही वेळातच फोटो झाला व्हायरल