कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल दरात भाववाढ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

इंधनाचे दर रोज बदलतात मात्र २४ एप्रिल नंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकींदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच होते. पण मतदान होताच आज पहिल्यांदाच पेट्रोल 17 पैसे महागले आहे, तर डिझेलमध्ये 21 पैशांची वाढ झाली आहे. १९ दिवस चाललेल्या कर्नाटक निवडणुकींनंतर आज वाढले आहेत. आज सकाळपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत पेट्रोल 82 रुपये 48 पैशांवरुन 82 रुपये 65 पैसे झाले आहेत. कोलकात्यात हाच दर 77 रुपये 32 पैशांवरुन 77 रुपये 50 पैसे झाला, तर चेन्नईत 77 रुपये 43 पैशांवरुन 77 रुपये 61 पैसे झाले आहेत. डिझेलचे दर मुंबईत  70 रुपये 20 पैशावरुन 70 रुपये 43 पैशांवर पोहोचले आहे. पेट्रोलची कीमत 77 रुपये 32 पैसे ने वाढून 77 रुपये 50 पैसे झाली आहे . तर चेन्नईमध्ये 77 रुपये 43 पैसे ने वाढून 77 रुपये 61 पैसे झाले आहे.

आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपये) :

मुंबई

पेट्रोल: 82.65

डिझेल : 70.43

पुणे 

पेट्रोल: 82.47

डिझेल : 69.20

नागपूर

पेट्रोल: 83.08.

डिझेल :70.90

औरंगाबाद

पेट्रोल 83.66

डिझेल 71.45

नाशिक

पेट्रोल :82.95

डिझेल: 69.65