‘या’ व्यक्तीने बनवलं ‘प्लास्टिक’ पासून ‘पेट्रोल’, पेट्रोलची किंमत फक्त ४० रुपये प्रति लीटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा कारनामा केला आहे. हा व्यक्ती आहे हैद्राबादमधील हैद्राबाद येथील रहिवासी आणि प्रोफेसर असलेले सतीश कुमार यांनी ही अणोखी शक्कल लढवली आहे. मुळात मॅकेनिकल इंजिनियर असलेले सतीश कुमार यांनी तीन टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर प्लास्टिकपासून पेट्रोल बनवले आहे. या प्रक्रियेला त्यांनी ‘प्लास्टिक पायरोलीसिस’ असे नाव दिले आहे. ज्यात प्लास्टिकला अप्रत्यक्ष पद्धती गरम करण्यात येते. त्यानंतर गॅसिफिकेशन आणि रेणू संकलनच्या प्रक्रियेनंतर हे पेट्रोल तयार होते.

याच बरोबरच सतीश कुमार यांनी हाइडोक्सी प्रायवेट लिमिटेड नावने कंपनी बनवलेली आहे. याच कंपनीतून ते प्लास्टिकपासून पेट्रोल बनवतात. तसेच प्लास्टिकचे रिसायकलिंग करुन त्यातून डिझेल, विमान इंधन, पेट्रोल बनवले जाते. जवळपास ५०० किलो प्लास्टिक, जे परत आपल्या वास्तविक अवस्थेत येऊ शकत नाहीत, त्याला या प्रक्रियेतून ४०० लीटर पेट्रोलमध्ये बदलण्यात येते. त्यांच्या मते ही अत्यंत सरळ प्रक्रिया आहे. ज्यात पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही.

दररोज बनवतात २०० लीटर पेट्रोल –

सतीश कुमार यांनी २०१६ पासून जवळपास ५० टन प्लास्टिकला पेट्रोल मध्ये बदलले. ते यात अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करतात ज्याचा परत पुनर्वापर करता येत नाही. दररोज जवळपास २०० किलो प्लास्टिकपासून ते २०० लीटर पेट्रोल बनवतात.

पेट्रोल ४० रुपये प्रतिलीटर –

पेट्रोल बनवल्यानंतर सतीश कुमार स्थानिक व्यापाऱ्यांना ४० ते ५० रुपये प्रतिलीटरने पेट्रोल विकतात. परंतू वाहनात वापरासाठी हे किती उपयोगी आहे यांची तपासणी होणे अजून बाकी आहे. PVC (पॉली विवाइल क्लोराइड) आणि PET (पॉली एथेलीन टॅरिफथेलेट) अंतर्गत जेवढ्या प्रकारचे प्लॉस्टिक येतात. त्या सर्वाचा वापर यात केला जातो. यातून काही प्लास्टिक देखील शिल्लक राहत नाही.

सतीश यांनी सांगितले की, हे तंत्र विकासित करण्यामागे मुख्य लक्ष आहे पर्यावरणाची सुरक्षा. यामागे आमचा कोणताही व्यवसायिक उद्देश्य नाही. आम्ही आमच्या सध्याच्या पिढीचे आणि भविष्यातील पिढीचे आयुष्य सुधारु इच्छित आहेत.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

Loading...
You might also like