पेट्रोल पुन्हा १५ पैशांनी महागले, पुण्यात दराची नव्वदीकडे वाटचाल!

मुंबई/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पेट्रोल पुन्हा १५ पैशांनी महागले आहे. आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोल ८९.६९ रुपये झाले आहे. तर डिझेलचे दर दोन दिवसांपूर्वी जे होते तेच आज शुक्रवारीही आहेत. दरम्यान, खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे शहरामध्येही पेट्रोलचे दर नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. २० सप्टेंबरला पुण्यात पेट्रोलचा प्रतिलिटर दर ८९.४० रुपये, तर डिझेलचा दर ७७.१० रुपये होता. आता त्यामध्ये आणखी १५ पैसे वाढीची भर पडली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c721d792-bd4f-11e8-b125-87501e999da3′]

मुंबईत मंगळवारी पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका होता. आता आज जाहीर झालेल्या दरांमध्ये मुंबईत पेट्रोल १५ पैशांनी महाग झाले आहे. डिझेलचे दर मात्र जैसे थे आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली नव्हती. आता दोन दिवसांनी मात्र पेट्रोल १५ पैशांनी महाग झाले आहे.

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून या वाहन मालकांना सध्या पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे डिझेलच्या वाढीने वाहतूकदारांच्या व्यवसायावर संकट आल्याने पुन्हा दरवाढीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3f25467-bd4f-11e8-8098-79b7dc9f4454′]

यंदाच्या मे महिन्यामध्ये पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक झाला होता. या कालावधीत पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर ७२.५० रुपयांपुढे पोहोचला होता. याच कालावधीत वाहतूकदारांनी मालवाहतूक आणि खासगी प्रवासी बसच्या भाड्यामध्ये वाढ केली होती. मात्र, इंधनाच्या सध्याच्या दरांनी सर्व मे महिन्यातील उच्चांकासह दराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील वर्षी याच महिन्यामध्ये पेट्रोल ७९ ते ८० आणि डिझेलचा दर ६१ ते ६२ रुपये होता. त्यात सध्या अनुक्रमे १० आणि १२ रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये दररोज काही पैशांनी वाढ नोंदविली जात असल्याने पुण्यातही पेट्रोल प्रतिलिटर ९० रुपयांपुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकारला सत्तेची संधी : अण्णा हजारे