सलग ८ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कमी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून इंधनाच्या किमतीत कपात होत असल्‍यामुळे वाहनचालकांना थोडा दिलासा मिळत आहे.

म्हणून इंधन स्वस्त झाले
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर कमी होत आहेत. यामुळे देशात इंधनाचे दर घसरत आहेत. आज दिल्‍लीत एक लिटर पेट्रोल ७०.४४ रुपयांना मिळणार आहे तर मुंबईत ७६.८ रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळणार आहे. दिल्‍लीमध्ये २८ जानेवारीपसून पेट्रोलच्या दरात ८३ पैशांची घट झाली आहे तर डिझेलच्या दरात ४९ पैशांची कपात झाली आहे. १२ जानेवारीपासून इंधनाच्या दरात रोज वाढ होत होती. परंतु, गेल्‍या आठ दिवसांपासून या इंधनदरवाढीला लगाम लागला आहे.