पेट्रोलचा पुन्हा ‘भडका’ ! आखातातील युद्धज्वराचा भारताला ‘फटका’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिका आणि इराण मध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका क्रुड ऑईलला बसला असून त्याच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे नव्या वर्षातील पहिल्या ९ दिवसांपैकी सलग ८ दिवस दररोज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यात १ जानेवारी २०२० रोजी ८०.५५ रुपये दर होता. आज ९ जानेवारी रोजी ८१.२१ रुपये झाला आहे. ८ दिवसात प्रति लिटर ६९ पैशांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी पुण्यात डिझेलचा दर ७०.९८ रुपयांवर पोहचला आहे.

आखातात अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे क्रुड इंधनाच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच तेल उत्पादनही घसरले आहे. त्याचवेळी युद्धाची शक्यता लक्षात घेऊन अनेक देशांकडून तेलसाठा वाढविण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याचा परिणाम दरामध्ये दररोज वाढ होऊ लागली आहे.

भारत हा जगातील एक मोठा तेल आयातदार देश आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होत असतो. ९ जानेवारी रोजी दिल्ली ७५.७४ रुपये, चेन्नई ७८.६९ रुपये, कोलकात्ता ८७.३३ रुपये, मुंबई ८१.३३ रुपये इतका पेट्रोलचा दर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/