इंधन दर वाढीमुळे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले

नांदेड : पोलिसनामा ऑनलाईन

इंधन दर वाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील बाबा पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनरला काळे फासले तर भोकर फाटा जवळ येथे चॉकलेट वाटप करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हाध्यक्ष तिरुपती (पप्पू) पाटील कोंढेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f4d3714-ce0e-11e8-b6e9-4b5d2ceaa7e6′]

चॉकलेट वाटप करून मोदी सरकारचा जाहिर निषेध –

इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटी मध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल,पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा यासाठी नांदेड जिल्हा युवक कॉंग्रेस च्या वतीने आज रोजी भोकर फाटा जवळ येथे मोदी सरकारचा जाहिर निषेध चॉकलेट वाटप करून करण्यात आले.

हे जग महिलांसाठी धोकादायक : मिशेल ओबामा


बॅनरला काळे फसून मोदी सरकारचा जाहिर निषेध –

युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हाध्यक्ष तिरुपती (पप्पू) पाटील कोंढेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली, अर्धापूर तालुक्यातील बाबा पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करुन पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनरला काळे फासून पेट्रोल, डिझेलला जीएसटी मध्ये समावेश करावा व निवडणूका पाहून दरवाढ करून नंतर दरकमी करणे हे जनतेच्या भावनाशी खेळने थांबवावे यासाठी निदर्शने करत भाववाढ कमी करण्यात यावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तिरुपती (पप्पू) पाटील कोंढेकर, जिल्हा महासचिव उमाकांत सरोदे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मदन कल्याणकर, माधव कदम, भगवान तिडके, विनोद चव्हाण(चिदगिरीकर), ज्ञानेश्वर राजेगोरे, अबुझरउल्ला बेग, शिवहारी गाढे, स्वप्निल टेकाळे, दता बंडाळे, मुकदेरखान पठाण, विक्की राऊत, अर्जुन गाढे, शहबाज खान, शंकर कल्याणकर, विलास देशमुख यांच्या सहअनेक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.