‘कोरोना’च्या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ ! 6 दिवसात ‘या’ कारणामुळे पेट्रोल 3.34 तर डिझेल 3.42 रुपयांनी प्रति लिटर महागलं

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशीदेखील वाढ झाली आहे. शुक्रवारी सरकारी ऑईल मार्केटींग कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 54 पैसे आणि डिझेलच्या दरात 59 पैसे वाढ केली आहेत. दिल्लीत आता पेट्रोलचे दर 59 पैशांनी वाढून 74.54 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहेत. तर, डिझेलच्या दरात 59 पैशांची वाढ झाली आहे. सहा दिवसात पेट्रोल 3.34 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.42 रुपये प्रति लीटरने महागले आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 81.53 – 71.48
पुणे 81.81 – 70.69
अहमदनगर 81.33 – 70.24
औरंगाबाद 81.93 – 70.81
धुळे 81.52 – 70.42
कोल्हापूर 81.75 – 70.66
नाशिक 81.76 – 70.64

का वेगाने वाढत आहेत दर
तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की, अंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. परंतु, किरकोळ बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. यापाठीमागे एक्साईज ड्यूटीमध्ये झालेली वाढ हे कारण आहे. 14 मार्चनंतर ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, अंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्चे तेल खुपच स्वस्त झाल्याने सरकारने त्या किमतीवर एक्साइज ड्यूटी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

पेट्रोलवर एक्साइज ड्यूटीमध्ये 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सरकारच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली आहे. या वाढीनंतर पेट्रोलवर एकुण उत्पादन शुल्क वाढून 32.98 रुपये लीटर आणि डिझेलवर 31.83 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता