सलग 11 व्या दिवशी दर वाढ ! पेट्रोल 55 तर डिझेल 60 पैसे प्रति लिटर महागले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेल कंपन्यांनी लागोपाठ 11 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. बुधवारी पेट्रोलच्या दरात 55 पैसे आणि डिझेलच्या दरात 60 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली. एकुण मिळून मागील 11 दिवसात पेट्रोल 6.02 रुपये आणि डिझेलचे दर 6.40 रुपये प्रति लीटरने वाढवले आहेत. इंधन कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर 76.73 रुपयांवरून वाढून 77.28 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर डिझेलचा दर 75.19 रुपयांनी वाढून 75.79 रुपये प्रति लीटर झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई  84.15 – 74.32
पुणे 84.46 – 73.51
ठाणे  84.27 – 74.44

अहमदनगर 84.13 – 73.74
औरंगाबाद 84.70 – 74.83
धुळे 84.07 – 73.15
कोल्हापूर 84.35 –  73.43
नाशिक 83.87 –  72.95
रायगड 83.87 – 72.92

इंधन कंपन्या अंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या दरात होणार्‍या बदलानुसार संपूर्ण देशात पेट्रोल, डिझेलचे दर समान पद्धतीने वाढवतात किंवा कमी करतात. परंतु, राज्यांमध्ये विविध स्थानिक कर लागल्याने विक्री किंमत वेगवेगळी असते. तेल कंपन्यांनी 7जूनपासून जेव्हा दोन्ही इंधनांच्या दरात रोजच्या दुरूस्तीला सुरूवात केली तेव्हापासून लागोपाठ दर वाढत चालले आहेत.

या अगोदर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लागोपाठ 82 दिवस दरांमध्ये कोणताही बदल केला नव्हता. याकाळात मोठ्याप्रमाणात कच्च्या तेलाचे दर घसरले होते. ही संधी साधून केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी दर कमी न करता कमी झालेल्या दरावर उत्पादन शुल्क वाढवले, आणि किंमत स्थिर असल्याचे भासवले.

थोडक्यात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिन्दुस्तान पेट्रालियम कार्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने लॉकडाऊन काळात केलेली उत्पादन शुल्क वाढ ही अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आलेल्या घसरणीत समायोजित केली होती.