Petrol Price | खुशखबर ! ऑगस्टपेक्षा स्वस्त होऊ शकते पेट्रोल, जाणून घ्या काय आहे OPEC देशांचा प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेट्रोल-डिझेलच्या (Petrol price today) च्या किंमती लवकरच कमी होण्याची आशा आहे. रविवारी ओपेक गटासोबत झालेल्या बैठकीनंतर आशा व्यक्त केली जात आहे की पेट्रोल (Petrol Price) लवकरच स्वस्त होऊ शकते. या बैठकीत सहमती झाली असून त्या अंतर्गत पाच OPEC आणि विना ओपेक देश कच्च्या तेलाचे उत्पादन ऑगस्टपासून वाढवतील. यापूर्वी या देशांमधील वादातून तेलाच्या किमतीवर परिणाम झाला होता.

तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांची संघटना (OPEC) आणि त्यांच्या सहकारी उत्पादक देशांच्या
ऑनलाइन बैठकीनंतर रविवारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, इराक, कुवैत, रशिया, सौदी अरब आणि यूएईच्या
तेल उत्पादनाची मर्यादा वाढेल. रशिया ओपेक चा सहयोगी आहे.

4,00,000 बॅरलची होईल वाढ

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, ओपेक देशांनी म्हटले की, ऑगस्टपासून त्यांच्या
उत्पादनात दर महिना रोज 4,00,000 बॅरलची वाढ केली जाईल आणि अशाप्रकारे यावेळी
लागू 58 लाख बॅरल प्रति दिवसाची कपात हळुहळु 2022च्या अखेरपर्यंत संपेल.
या निर्णयानंतर 2 मिलियन बीपीडी उत्पादनाला सुरळीत करता येऊ शकते.

कोणत्या देशांचे वाढेल उत्पादन?

नवी ठरलेल्या धोरणाअंतर्गत UAE मे 2022 पासून प्रति दिन 35 लाख बॅरलचे उत्पादन करू शकेल. वृत्तानुसार, यूएई अगोदर आपल्यासाठी 38 लाख बॅरल/ दैनिक उत्पादन मर्यादेची मागणी करत होता.
अशाच प्रकारे सौदी अरबची दैनिक उत्पादन मर्यादा 1.10 करोड बॅरलने वाढवून 1.15 कोटी बॅरल होईल. रशियाची सुद्धा उत्पादन क्षमता इतकीच राहील.
इराक आणि कुवैतची दैनिक उत्पादन मर्यादेतील वाढ यापेक्षा थोडी कमी राहिल.

Web Title : Petrol Price | petrol and diesel prices may come down opec agrees to iron out supply constraints check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | मुंबई उच्च न्यायालयानं सचिन पोटे, अजय शिंदे, विठ्ठल शेलार यांच्यावरील मोक्क्याच्या तपासाबाबत दिला ‘हा’ महत्वपुर्ण आदेश

Madha Police | माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून 4 आरोपींचे पलायन

Mumbai Police | कडक सॅल्यूट ! भर पावसात जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं