Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे रोज नवीन विक्रम, मुंबईत 103 रुपयांवर पोहचला एक लीटरचा भाव

नवी दिल्ली : गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल (Petrol and Diesel) चे दर वाढले. आज पेट्रोलमध्ये प्रति लीटर 26 पैशांची वाढ झाली तर डिझेलमध्ये सुद्धा 7 पैशांची वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोल 97.76 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 88.30 रुपये प्रति लीटरवर गेले.

मुंबईत पेट्रोल 103.89 रुपयांवर

मुंबईत पेट्रोल 103.89 रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेलची किंमत 95.79 रुपये प्रति लीटर झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 97.63 आणि डिझेल 91.15 रुपये प्रति लीटरमध्ये विकले जात आहे.

Pune Ambil Odha Slum । आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक रहिवाशांमध्ये राडा, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर अनुक्रमे 98.88 आणि 92.89 रुपये प्रति लीटर झाले आहेत. आज लखनऊमध्ये पेट्रोल 94.95 रुपये आणि डिझेल 88.71 रुपये प्रति लीटर आहे. पाटणामध्ये पेट्रोल 97.95 रुपये आणि डिझेल 93.63 रुपये प्रति लीटर आहे.
तेल कंपन्या अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा मागील 15 दिवसाचा सरासरी भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात तेजी किंवा घसरण या आधारवर इंधनाचा भाव ठरवतात.

petrol price today | petrol diesel prices hiked today consumers brace for fuel at rs 100 in mumbai

दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारकडून भरक्कम टॅक्स वसूल केला जातो. पेट्रोल पम्पपर्यंत इंधन पोहचण्यासाठी माल वाहतुक आणि डिलर कमिशन इत्यादीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.

Health Insurance Cover | IRDA नं कंपन्यांना नवीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणण्यास सांगितलं, घरात होणार्‍या उपचारांचा सुद्धा ‘विमा’

पेट्रोल-डिझेलवर किती टॅक्स वसूल करते सरकार

– मोदी सरकार प्रति लीटर पेट्रोल पर 34.80 टक्के एक्साईज ड्यूटी वसूल करते, एक्साईज ड्यूटीतील 100 टक्के पैसे केंद्र सरकारच्याच तिजोरीत जातात. तर राज्य सरकार 23.08 टक्के टॅक्स वसूल करते.

Atal Pension Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दर महिना मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

– डिझेलवर केंद्र सरकार 37.24 टक्के आणि राज्य सरकार 14.64 टक्केपर्यंत टॅक्स वसूल करते.

–  मागच्या वर्षी कोरोना काळात तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण होऊनही ग्राहकांना लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने एक्साईज ड्यूटीत विक्रमी वाढ केली होती.

petrol price today | petrol diesel prices hiked today consumers brace for fuel at rs 100 in mumbai

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते.

फेसबुक ला लाईक करा

या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते.
ट्विटर ला देखील फॉलो करा
यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

तुमच्या Aadhaar Card द्वारे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने घेतले आहे का फोन कनेक्शन, ‘या’ पद्धतीने चेक करून लवकर करा बंद; ही आहे पद्धत

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

Pimpri News | सिगारेट आणण्यास नकार दिल्याने टोळक्याचा तरुणाला कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

फेसबुक ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel : petrol price today | petrol diesel prices hiked today consumers brace for fuel at rs 100 in mumbai