पेट्रोल, डिझेलच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ होत आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली असून दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या बराेबरीवर आहेत. दरम्यान , डिझेलच्या दरानेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मुंबईत सध्या पेट्राेलचे दर ९०.३४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचेदर ८०.४७ रुपये आहेत. डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहेत. पेट्राेलचे दर ४ ऑक्टाेबर, २०१८च्या उच्चांकी पातळीवर आले आहेत.

राज्यात शु्क्रवारी नांदेडमध्ये सर्वाधिक ९२.६९ रुपये प्रति लिटर एवढे पेट्राेलचे दर झाले आहेत, तर अनेक शहरांमध्ये पेट्राेलचे दर ९० रुपयांपेक्षा जास्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काही दिवसात पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या महिनाभरात सुमारे १० ते १२ डाॅलर्स प्रति बॅरलने वाढले आहेत, परंतु ओपेककडून उत्पादनात करण्यात आलेली घट, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे कच्चे तेल महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या इंधन दरवाढीचा काँग्रेस, मनसे यांसह विविध पक्ष, संघटनांनी विरोध केला असून केंद्र सरकारने इंधन दर कमी करावे अशी मागणी केली आहे.