‘या’ अटींवर Green आणि Orange zone मध्ये जाण्या-येण्याची मिळाली परवानगी, जाणून घ्या पेट्रोलचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव रोख्याण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील लोकांना कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. एक महिना चाललेल्या लॉकडाऊनमुळे लोकांची कामे थांबली होती. मात्र, आता या आदेशामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या कार आणि दुचाकी आता रस्त्यावर फिरताना दिसणार आहेत. परंतु अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय असतील हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आजच्या पेट्रोलच्या किंमती
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकताता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलच्या किंमती अनुक्रमे 69.59, 73.00, 76.31 आणि 72.28 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तर याच चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती अनुक्रमे 62.29, 65.62, 66.21 आणि 65.71 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत.

तीन राज्यांत किंमती वाढल्या
इंधनावरील सेस-स्टॅक्समुळे 3 राज्यातील दर वाढले आहेत. नागालँडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कोविडी -19 उपकर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात लिटरमागे 6 रुपये आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय आसामध्ये डिझेलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि पेट्रोलवर प्रतिलिटर 6 रुपये कर वाढविण्यात आला आहे. तसेच मेघालयात कर लादण्यात आल्याने याठिकाणी देखील दर वाढले आहेत.