खुशखबर ! 12 रूपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल, टाकी फुल करण्याची करा तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या भीती दरम्यान, महागाईपासून दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे कमी भाव आणि मागणी कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचे दर 12 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. काल कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 1,672 रुपये म्हणजेच 10.51 रुपये प्रतिलिटर घट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठ्या सरकारी SBI च्या एका अहवालात म्हटले की, जागतिक बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतींमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे, पेट्रोलची किंमत 12 रुपयांनी खाली येऊ शकते तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या व्यवसायात घसरत :
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील कोरोना विषाणूच्या भीतीमुळे तेल बाजार घसरण्याच्या दिशेने जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बुधवारी 18 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर कच्च्या तेलाचा मार्च कॉन्ट्रॅक्ट मागील सत्रापासून 400 रुपये म्हणजेच 190.9 टक्क्यांच्या घसरणीसह 1,695 रुपये प्रति बॅरल व्यवसार सुरु होता. तर आधीचा भाव 1,672 रुपये प्रति बॅरलपर्यंत घसरला. दरम्यान, एका बॅरेलमध्ये 159 लिटर कच्चे तेल असते. अशाप्रकारे, देशात एक लिटर कच्च्या तेलाची किंमत 10.51 रुपये असेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत :
इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज (आयसीई) वर ब्रेन्ट क्रूडच्या मे कॉन्ट्रॅक्टच्या मागील सत्रात 3.21 डॉलर म्हणजेच 11.17 टक्के घसरणीसह 25.52 डॉलर प्रति बॅरलवर टिकून होता. तर याआधी ब्रेंटच्या किंमती 25.33 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला जो 2003 नंतरचा हा निच्चांकी स्तर आहे.