इंधन दरवाढीची आग आणखी भडकली, अनेक शहरात पेट्रोल नव्वदीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. सोमवारी पेट्रोलने नव्वदी पार केल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ९०.२२ रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर ७८.६९ रुपये प्रति लिटर झाला आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतील अशी भीती व्यक्त होत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर ८२.८६ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर ७४.१२ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e803c5e-c07d-11e8-a72b-9fae477bd877′]

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. इंधन दरवाढीवर सरकारकडून अजूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. सध्या तील भाव प्रति बॅरल ८० डॉलर्सच्या आसपास आहे. या वर्षअखेरीपर्यंत हा दर शंभर डॉलर्स पार करू शकतो, असा अंदाज सिंगापूरमध्ये एशिया पॅसिफिक पेट्रोलियम कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय आर्थिक सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी पेट्रोल दरवाढीबाबत ४ नोव्हेंबरपर्यंत ठोस पाऊले उचलण्यात येतील, असे वक्तव्य केले होते. मात्र, अजूनपर्यंत कोणतेही पाऊल केंद्राकडून उचलले गेलेले नाही. अशीच परिस्थिती राहिली तर नव्वद रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल लवकरच शंभरी पार करू शकते असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत.

[amazon_link asins=’B07C3T337H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17adc8b2-c07d-11e8-97db-f105f601142e’]

अमेरिकेनं इराणवर आर्थिक निर्बंध तर लागू केले आहेत. तसेच नोव्हेंबर ४ पासून इराणच्या तेलाच्या निर्यातीवरही हल्लाबोल करण्याचे संकेत दिले आहेत. इराणकडून कच्चे तेल घेऊ नये यासाठी अमेरिका अन्य देशांवरही दबाव टाकत आहे. परिणामी ख्रिसमसच्या सुमारास कच्च्या तेलाचे भाव ९० डॉलर्स प्रति बॅरल होऊ शकतात, आणि नवीन वर्षाच्या आगमनावेळी हा भाव शंभरी पार करू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींसाठी आज न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल