पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलियम कंपन्या भरमसाट नफा कमवत असतानाही अनिर्बंधपणे पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज वाढ सुरु ठेवण्यात आली आहे.

आज मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा लिटरमागे २६ पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात आज पेट्रोलचे दर ९७.५६ रुपये लिटरवरुन ९७.८२ रुपये लिटरपर्यंत वाढले आहेत. डिझेलच्या दरातही आज ३१ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल ८७.५१ रुपयांवरुन ८७.८२ रुपये लिटर झाले आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरातही २६ पैशांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोल आता १०१.२४ पैशांवरुन १०१.५० रुपये लिटर झाले आहे.