तब्बल ११ दिवसांनंतर पेट्रोलची ‘घोडदौड’ थांबली; जाणून घ्या आजचे दर

पुणे : गेली ११ दिवस दररोज होणारी पेट्रोल, डिझेलमधील भाववाढ आज १२ व्या दिवशी तात्पुरती थांबली आहे. आज कोणतीही दरवाढ अथवा घट झाली नाही. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज पुण्यात कालच्या प्रमाणेच पेट्रोल ९६.६२ रुपये प्रति लिटर असणार आहे. डिझेलचा दर ८६़.३६ रुपये प्रति लिटर आणि पॉवर पेट्रोल प्रति लिटर १००.३१ रुपये असणार आहे.

गेली ११ दिवस पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज वाढ होत होती. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणचे पेट्रोलचे दर शंभराच्या पुढे गेले आहेत. या ग्राहकांना किमान आजचा रविवार दिलासादायक ठरला आहे.