सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलच्या दरात आज २४ पैशांनी वाढ झाली आहे. ९६.८० रुपये असलेल्या पेट्रोलचा एक लिटरचा दर आज ९७.०४ रुपये झाला आहे. डिझेलच्या दरात ३१ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर ८६.५४ वरुन आता ८६.८५ रुपये लिटर इतका झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या किंमतीत २४ पैशांची वाढ झाली असून ते आजपासून १००.७२ रुपये लिटर झाले आहे. राज्यातील अनेक शहरातील पेट्रोलचा दर १०० रुपयांहून अधिक झाला आहे.