पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ !

पुणे : देशात आज पुन्हा सलग पाचव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून डिझेलचा दराने ८४ रुपयांचा आकडा पार केला आहे. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा २९ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.५७ रुपये असणार आहे. डिझेलच्या दरात आज ३८ पैशांनी वाढ करण्यात आली असून डिझेलच प्रति लिटर दर ८४.०५ रुपये इतका झाला आहे.