Pew Survey News | भारतातील मुस्लिमांना वाटते त्यांच्यासाठी असावे वेगळे कोर्ट, ‘इतके’ टक्के भारतीयांना नको असतो मुस्लिम शेजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ’भारतात धर्म : सहिष्णुता आणि पृथक्करण’ विषयावर प्यू रिसर्च सेंटरने Pew Survey News एक रिपोर्ट जारी केला आहे ज्यामधून अनेक प्रकारच्या गोष्टी समोर आल्या आहेत. हा रिपोर्ट 17 भाषांमध्ये 30 हजार लोकांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. रिसर्चच्या दरम्यान बहुतांश लोकांनी म्हटले की, आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी स्वातंत्र्य आहे. यातून ही गोष्ट समजणे खुप सोपे झाले की, भारतातील लोकांमध्ये धर्माप्रती समर्पण आणि प्रेम खुप जास्त आहे. pew survey muslims demand their own court india is a tolerant largely conservative country christians hindu muslim shadi

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या गोष्टीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जरी शहर असो किंवा गाव 60 टक्के लोक रोज पूजा-अर्चनेत काही ना काही वेळ आवश्य देतात.
रिसर्चमध्ये देशाच्या सर्व मोठ्या 6 धार्मिक गटांमध्ये सर्व धर्माच्या सन्मानाची बाब समोर आली आहे.

प्यू रिसर्च सेंटरने ’भारतात धर्म: सहिष्णुता आणि पृथक्करण’ शीर्षकाचा सर्वे 2019 च्या अखेर आणि 2020 च्या सुरुवातीच्या दरम्यान 17 भाषांमध्ये केला.
यामध्ये जवळपास 30,000 लोकांशी चर्चा करण्यात आली,
ज्या आधारावर अनेक प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
यातून ही गोष्ट समोर आली आहे की, भारतीय लोकांमध्ये या गोष्टीबाबत एकमत आहे की एकमेकांच्या धर्माचा सन्मान करणे खुप आवश्यक आहे.

सर्वेनुसार भारतीयांमध्ये इतर समाजातील लोकांमध्ये मैत्रीबाबत दूरावा स्पष्ट दिसून येत आहे.
इतकेच नव्हे, विवाहित प्रौढांमध्ये 99% हिंदू, 97% मुस्लिम आणि 95% ईसाईंनी आपल्याच धर्मात विवाह करण्याचे काम केले आहे.
67% हिंदु, 80% मुसलमान आणि 54% कॉलेज पदवीधरांचे म्हणणे आहे की,
आपल्या समाजाच्या महिलांना दुसर्‍या धर्मात विवाह करण्यापासून रोखणे खुप आवश्यक आहे.

महिला किंवा पुरुषांद्वारे अंतरजातीय विवाह रोखण्यासाठी सर्व समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात सहमत असल्याचे दिसून आले.
हिंदूप्रमाणे 77% मुस्लिम कर्मावर विश्वास ठेवतात.

सर्वेतील काही महत्वाच्या गोष्टींवर एक नजर
– 36% भारतातील लोकांना असे वाटते की, त्यांचा शेजारी मुस्लिम नसावा.
जैन धर्मातील लोकांमध्ये ही संख्या 54% आहे ज्यांना मुस्लिम शेजारी असू नयेत असे वाटते.

– 81% भारतीयांचे म्हणणे आहे की गंगा पवित्र नदी आहे आणि तिच्या पाण्यात पवित्र करण्याची शक्ती आहे.
तर असे मानणार्‍या ईसाइंची संख्या 33% आहे.

– 66 % हिंदूंचे म्हणणे आहे की, त्यांचा धर्म इस्लामपेक्षा एकदम वेगळा आहे.
तर, 64% मुस्लिमांचे सुद्धा हेच म्हणणे आहे.

-77% हिंदू आणि जवळपास इतकेच मुस्लिम कर्माच्या फळावर विश्वास ठेवतात.

– उत्तर भारतात 12% हिंदू, 10% शिख आणि 37% मुस्लिम सूफीवादावर विश्वास ठेवतात.

– 74% मुस्लिमांनी कौटुंबिक वाद, घटस्फोट सारख्या प्रकरणात आपल्यासाठी वेगळे धार्मिक कोट असावे म्हटले.

– 48% मुस्लिमांनी मान्य केले की, उपखंडात विभाजन जातीयवादी संबंधात तणावासाठी चांगली गोष्टी नाही.

Web Titel : pew survey muslims demand their own court india is a tolerant largely conservative country christians hindu muslim shadi

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई