YouTube वरून सर्वात जास्त कमाई करणाऱ्यानं इंटरनेट सेलिब्रेटी सोबत केलं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्यूडीपी नावाने प्रसिद्ध असलेला यूट्यूबवरून सगळ्यात जास्त कमाई करणारा व्यक्ती फेलिक्स केजेलबर्ग यांनी आपल्या गर्लफ्रेंड मार्जिया बिसगोन सोबत विवाह केला. दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

फेलिक्स केजेलबर्ग उर्फ़ प्यूडीपी ने लंडन मधील एका समारंभामध्ये आपल्या परिवारासोबत आणि नातेवाईकांच्या साक्षीने विवाह केला. चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांना भेटलेले हे दोघे आठ वर्षांपासून सोबत होते.

प्यूडीपीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, आम्ही लग्न केले आहे, मी खूप आनंदी आहे कारण माझ्या जीवनाची सुरुवात मी एका शानदार व्यक्ती सोबत सुरु करणार आहे.

मार्जिया ने इंस्टाग्राम वर लिहिले आहे की, उद्या १९ ऑगस्ट ठीक ८ वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो, त्याच दिवशी आपण आपल्या परिवारासोबत नातेवाईकांच्या साक्षिने लग्न केले होते.

स्वीडनच्या फेलिक्स केजेलबर्ग उर्फ़ प्यूडीपी ने इटली ला राहणाऱ्या मार्जियाला २०११ मध्ये डेट करायला सुरुवात केलती. मार्जिया एक इंटरनेट सेलिब्रेटी आणि फॅशन डिझायनर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like