Homeताज्या बातम्याPF Account e-Nomination | पीएम खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन करणे झाले अनिवार्य ! आता...

PF Account e-Nomination | पीएम खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन करणे झाले अनिवार्य ! आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी येणार नाही अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PF Account e-Nomination | कर्मचारी भविष्य निधी कर्मचार्‍यांसाठी (EPFO) आता ई नॉमिनेशन करणे अनिवार्य केले आहे. यामुळे आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेणार्‍या लोकांना त्रासाचा सामना करावा लागणार नाही. पीएफ खातेधारकाचा नॉमिनेशन फॉर्म (PF Account e-Nomination) भरलेला नसल्याने त्यांना विमा किंवा पेन्शनचा लाभ घेण्यात अडचण येते.

 

जर एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यात सुद्धा समस्या येते. अशावेळी या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी भविष्य निधी संघटनेचा हा निर्णय लाभदायक ठरेल.

 

जर पीएफ खातेधारकांनी ई नॉमिनेशन भरले (PF Account e-Nomination) तर विम्याचा लाभ, निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ खातेधारकांना मिळेल. पीएफ आयुक्त पाटणा बृजेश कुमार यांनी माहिती देताना म्हटले की, जर खातेधारकांनी ई नॉमिनेशन केले तर त्यांना एनओसी घेण्याची आवश्यकता नाही. जर कर्मचारी विवाहित असेल तर त्याच्या पत्नीला आधार-वोटर कार्ड, फोटोसह ई-नॉमिनेशन नोंदवावे लागेल. या अंतर्गत आता कुणीही विवाहित व्यक्ती नॉमिनीचे नाव या सुविधेंतर्गत सहजपणे नोंदवू शकतो.

 

असे भरू शकता ई नॉमिनेशन

 

 • प्रथम EPFO ची वेबसाइट www.epfindia.gov.in वर व्हिजीट करा.
 • तुमचा UAN No. आणि पासवर्ड नोंदवून लॉगइन करा.
 • नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून ई-नॉमिनेशन ऑपशन निवडा.
 • आता नवीन पेज ओपन होईल, तिथे मेंबरची पूर्ण माहिती जसे की, नाव, UAN, जन्म तारीख दिसेल.
 • नंतर मुळ आणि सध्याचा पत्ता नोंदवून सेव्ह ऑपशनवर क्लिक करा.
 • आता कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी YES च्या पर्यायावर क्लिक करून अ‍ॅड फॅमिली ऑपशनवर जा.
 • तिथे नॉमिनीचे नाव, नाते, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर नोंदवा.
 • नंतर नॉमिनेशन डिटेल्सवर जाऊन हे ठरवू शकता की कोणत्या नॉमिनीला EPF चा किती भाग दिला जावा.
 • नंतर सेव्ह नॉमिनेशन ऑपशनवर क्लिक करा.
 • यानंतर OTP जनरेट करावा लागेल, ज्यासाठी ई-साइन टॅबवर क्लिक करा.
 • यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
 • आलेला ओटीपी भरताच ई-नॉमिनेशन EPFO सोबत रजिस्टर होईल.

 

Web Title : PF Account e-Nomination | e nomination made mandatory for pf account holders now there will be no problem in taking advantage of insurance and pension

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | लष्करात असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्यचार

President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News