खुशखबर ! PF खातेधारकांना व्याज मिळण्यास सुरूवात, Miss Call करून तपासा ‘बॅलन्स’ आणि असे काढा पैसे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहा कोटी पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधि संगठन म्हणजेच EPFO कडून दिवाळीच्या आधी मोठे बक्षीस मिळणार आहे. EPFO ने आपल्या खातेधारकांच्या खात्यात व्याज जमा करणे सुरु केले आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी 8.65 टक्के व्याज जमा करण्यास सुरुवात केली असून अनेकांच्या खात्यात ते जमा देखील झाले आहे.
मिस कॉल वरून जाणून घ्या बॅलेन्स –
तुम्ही विविध मार्गांनी तुमचा बॅलेन्स पाहू शकता. मात्र मिस कॉलवरून हा बॅलन्स जाणून घेणे सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याशी जोडलेल्या अधिकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण माहितीचा मॅसेज तात्काळ मिळेल. यामध्ये तुम्हाला तुमचा बॅलेन्स समजण्यास मदत होईल.
या क्रमांकावर मॅसेज करून मिळवा माहिती –
यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN टाईप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा. या सेवेचा फायदा तुम्ही हिंदी, इंग्रजी, पंजाबी सह 10 भाषांमध्ये पाहू शकता. यासाठी विविध भाषाकोड देण्यात आले असून तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही माहिती मागवू शकता. जर तुम्हाला हिंदीमध्ये माहिती पाहिजे असेल तर EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
भाषा कोड
1) इंग्रजीसाठी कोड नाही
2) हिंदी- HIN
3) पंजाबी – PUN
4) गुजराती – GUJ
5) मराठी – MAR
6) कन्नड – KAN
7) तेलगु – TEL
8) तमिळ – TAM
9) मल्याळम – MAL
10) बंगाली – BEN
अशापद्धतीने काढा ऑनलाईन पैसे –
1) तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे काढल्यास १० दिवसांच्या आताच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
2) सर्वात आधी तुम्हाला पीएफच्या ऑनलाईन वेबसाईटवर लॉगइन करावे लागणार आहे.
3) त्यानंतर वर दिसणाऱ्या बारमध्ये Online Services या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल. यामध्ये तुम्हाला क्लेम करायचा आहे. तुम्ही क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोसेस सुरु होईल.
4) त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर मिळत राहील. मात्र ऑनलाईन क्लेम करण्यासाठी तुमचे आधारकार्ड तुमच्या पीएफ खात्याला जोडणे अनिवार्य असणार आहे.
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी