लाखो PF खातेधारकांना हे माहित नसेल ! मोफत मिळतेय 6 लाखांचे विमा ‘कवच’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सेवानिवृत्तीनंतरही ईपीएफ खातेदारांना वित्तीय कव्हरेज (ईपीएफओ फायनान्शीयल कव्हरेज) देते. मात्र, याची माहिती फारच थोड्या लोकांना आहे. ईपीएफओ लाईफ कव्हर देखील देते. सेवेदम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या ईपीएफ खातेधारकांना लाईफ कव्हर म्हणून 6 लाख रुपये मिळतात. ईपीएफ खातेदारांना ईडीएलआय 1976 च्या नियमांनुसार हे विमा संरक्षण मिळते.

विनामूल्य मिळतो फायदा
या बाबत एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, ईपीएफओ सर्व भविष्य निर्वाह निधी धारकांना नि:शुल्क लाईफ कव्हर प्रदान करते. ईडीएलआय 1976 च्या नियमांनुसार, प्रत्येक ईपीएफओ ग्राहकांना हे कव्हर पूर्णपणे विनामूल्य मिळते.

कोणत्या प्रकरणात मिळते कव्हर आणि कोण दावा करू शकतो
ईपीएफओ ग्राहकांसाठी ही रक्कम त्यांच्या मूलभूत पगाराच्या 20 पट किंवा 6 लाख रुपयांची असते. यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम ग्राहकांना मिळते. या विम्याचा दावा ईपीएफओच्या ग्राहकांच्या वारसदाराकडून केला जाऊ शकतो. जर एखादा कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून आजारी असेल किंवा जर त्याचा मृत्यू झाला तर मग या कव्हरचा दावा केला जाऊ शकतो. या अंतर्गत वारसदार व्यक्तीला ईडीएलआय अंतर्गत एकदा दावा करता येतो.

ईडीएलआय 1976 च्या नियमांनुसार केवळ अशाच ग्राहकांना याचा फायदा मिळतो, ज्यांच्याकडे कोणताही वैद्यकीय विमा नाही. या नियमांचा विशेषत: उद्योग किंवा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो. सामान्यत: असे कर्मचारी ज्यांना विमा कंपनीकडून वैद्यकीय विम्याचा लाभ मिळू शकत नाही.

अलीकडेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT – Central Board of Trustees) लाईफ कव्हरची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.