PF Account मध्ये 2 दिवसांत येणार व्याजाचे पैसे ! जाणून घ्या EPFO नं याबाबत काय दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF Account | कोरोना संकटात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) 6 कोटी खातेधारक अपेक्षा करत होते की, जुलै 2021 साठी प्रॉव्हिडंट फंडच्या व्याजाचे पैसे (PF Interest Amount) त्यांच्या खात्यात जमा होतील. मात्र, 31 जुलैपर्यंत ईपीएफओने पैसे ट्रान्सफर केले नाही. यानंतर पीएफ खातेधारकांना आशा आहे की, त्यांना पीएफचे (PF Account) पैसे पुढील दोन दिवसांच्या आत म्हणजे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मिळतील. आता ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले आहे की, पीएफच्या व्याजाची रक्कम सबस्क्रायबर्सच्या खात्यात केव्हापर्यंत ट्रान्सफर होईल.
ईपीएफओच्या ट्विटरवर टॅग करत एका खातेधारकाने विचारले की, ईपीएफओकडून व्याजाचे पैसे केव्हा ट्रान्सफर केले जातील. यावर ईपीएफओकडून सांगण्यात आले की, व्याजाची रक्कम एकाचवेळी खात्यात ट्रान्सफर केली जाईल. कुणाचेही व्याजाबाबत नुकसान होणार नाही. मात्र, ईपीएफओने हे सांगितले नाही की, व्याजाचे पैसे केव्हा ट्रान्सफर होतील.
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजास मंजूरी दिली आहे. तरीसुद्धा कर्मचार्यांना आशा आहे की, पुढील दोन दिवसात पीएफच्या व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यात येतील. पीएफ बॅलन्स कशाप्रकारे जाणून घेऊ शकता याबाबत माहिती घेवूयात…
एसएमएसने असा चेक करा बॅलन्स
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
मिस्ड कॉलने असा पहा बॅलन्स
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
ईपीएफओद्वारे असा चेक करा बॅलन्स
तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता.
यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा.
यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
Web Title : Pune Crime | What do you say Yes, theft in 439 flats in Pune, know the case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Maharashtra Night Curfew | राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता
- PFRDA | NPS नियमांमध्ये बदल ! सहभागी होणार्याचे वय वाढवले, बाहेर पडण्याचा नियम सुद्धा झाला सोपा, जाणून घ्या
- Pune Corporation | पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ‘ऑफ लाईन’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद