नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील संघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांचे पीएफ अकांऊंट (PF account) असते. पीएफ खातेधारकांना ईपीएफओ (EPFO) कडून अनेक असे फायदे मिळतात, ज्याची माहिती खुप कमी लोकांना असते. पेन्शन आणि विमाशिवाय बोनससारखे अनेक फायदे घेण्यासाठी केवळ काही अटी पूर्ण कराव्या लागतात. (PF Account)
यापैकी एक फायदा कर्मचार्याच्या निवृत्तीनंतर मिळणारा अॅडिशनल बोनस आहे. या अॅडिशनल बोनसची (Additional Bonus) रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते मात्र, ते मिळवण्यासाठी काही नियम ठरलेले आहेत ते पूर्ण करणे गरजेचे असते.
20 वर्षापर्यंत PF Account मध्ये पैसे जमा करणे आवश्यक
अॅडिशनल बोनसची रक्कम कोणत्याही कर्मचार्याला लॉयल्टी लाईफ बेनिफिटद्वारे ईपीएफओ देते. मागील 20 वर्षापासून अकाऊंटमध्ये पैसे जमा करणार्या पीएफ खातेधारकांना याचा लाभ मिळतो.
कशी ठरते रक्कम
अॅडिशनल बोनस संबंधित नियम पाहिले तर यामध्ये बेसिक सॅलरीच्या हिशोबाने रक्कम ठरवली जाते. ज्या पीएफ खातेधारकांची बेसिक सॅलरी 5 हजार रुपयेपर्यंत असते त्यांना 30 हजार रुपयांपर्यंतचा अॅडिशनल बोनस निवृत्तीनंतर मिळतो.
तर, 5 हजार ते 10 हजारपर्यंत बेसिक सॅलरी घेणार्या नोकरदारांना 40 हजार रुपयांपर्यंत अॅडिशनल बोनल मिळतो. तसेच, ज्यांची बेसिक सॅलरी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 50 हजार अॅडिशनल बोनस मिळतो.
‘यांच्या’साठी 20 वर्षाचे बंधन नाही
जे कर्मचारी 20 वर्षापूर्वी पूर्णपणे अपंग होतात त्यांना या अटीतून सूट दिली जाते. अशा कर्मचार्यांना निवृत्तीनंतर अॅडिशनल बोनस (Additional Bonus) दिला जातो. मात्र, यासाठी अॅडिशनल बोनससाठी रक्कम ठरवण्यासाठी नियम बेसिक सॅलरीचाच असतो.
Web Title :- PF Account | pf account holder get an additional bonus of 50 thousand rupees EPFO
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Omicron Covid Variant | चिंताजनक ! पुण्यानंतर जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग