24 सप्टेंबरला होणार ‘PF’ संबंधित मोठा ‘निर्णय’, ‘हे’ होऊ शकतात ‘बदल’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – आता PF आपल्या खातेधारकांना लवकरच एक खास सुविधा उपलब्ध करुन देणार आहे, ज्यात स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही PF चे संपूर्ण पैसे एनपीएसच्या माध्यमातून गुंतवू शकालं. याशिवाय तुम्ही नव्या ठिकाणी नोकरीला लागलात तर तुम्हाला कोणती ईपीएफ ची योजना हवी अशी देखील विचारणा होईल. सरकारने हा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या 24 सप्टेंबरला यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. NPS ही एक सरकारी निवृत्ती योजना आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 ला ही लॉन्च केली होती. यानंतर ही योजना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अनिवार्य होती. ही योजना खासगी क्षेत्रात 2009 पासून लागू करण्यात आली. 
 
काय आहे ही योजना ? –

या योजनेत पीएफमधील पैसे एनपीएसमध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय तुम्हाला असेल. पीएफ मधील पैसे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही गुंतवू शकालं. यासंबंधित निर्णय 24 सप्टेंबरला होईल. यानंतर नव्या नोकरीत तुम्हाला ईपीएफ नाही तर एनपीएसचा देखील पर्याय उपलब्ध असेल.

NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला करात देखील सवलत मिळेल. ही सवलत 1.5 लाख रुपयांच्या टॅक्सही ही सवलत मिळेल. याशिवाय कलम 80 CCD (1B) नुसार अतिरिक्त 50 हजार रुपयांच्या कपातीचा फायदा मिळेल. निवृत्तीनंतर जास्त फायदा हवा असेल तर EPF तुम्ही NPS मध्ये ट्रान्सफर करु शकतात. 

 
परंतू तुमच्याकडे यासाठी आवश्यक असलेले NPS खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही NPS च्या पोर्टलवर जाऊन नवे खाते सुरु करु शकतात. हे खाते nptrust.org.in या अधिकृत वेबसाइटवरुन सुरु करु शकतात. 
हे अकाऊंट सुरु केल्यानंतर तुम्ही epf ट्रान्सफरसाठी अर्ज करु शकतात. यानंतर तुमचे epf चे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर करु शकालं.