तुमच्या ‘PF’ वरील व्याजाचं स्टेटस काय… आता ‘या’ ॲपद्वारे कळणार ‘PF’ खात्याचा बॅलन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएफच्या हिशोबानं खाजगी कंपन्यांत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ईपीएफओमध्ये नोंदणी असलेल्या मोबाइलवरून मिस कॉल्ड दिल्यावर मेसेजद्वारे पीएफच्या जमा रक्कमेची माहिती मिळते. परंतु आता पीएफ खात्यात किती रक्कम जमा हे अ‍ॅपद्वारे समजणार आहे. उमंग असं या अ‍ॅपच नाव असून कर्मचारी या अ‍ॅपच्या माध्यमातून सेवेच्या कार्यकाळातील पीएफच्या स्वरूपात जमा झालेला पैशाची सहजरीत्या माहिती मिळवू शकतात. उमंग अ‍ॅप हे स्मार्टफोन, डेस्कटॉप, टॅबलेट या सर्व माध्यमांवर डाऊनलोड करता येते.

अ‍ॅपद्वारे असा चेक करा बॅलन्स
त्यासाठी आपल्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (EPFO) मध्ये नोंदणी केलेला एक मोबाइल नंबर असायला हवा. जर तुमचा नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही सहज तुमच्या खात्यातील जमा रक्कम पाहू शकता. त्यासाठी उमंग अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. त्यानंतर ईपीएफओ पर्याय निवडा. ॲपवर लॉगिन करा. वर डावीकडच्या कोपऱ्यात सर्व्हिस डायरेक्ट्रीमध्ये जाऊन ॲपवर लॉगिन करा . इपीएफओ शोधून त्यावर क्लिक करा. व्हियू पासबूकमध्ये जाऊन युएन नंबर टाइप करा. नंतर मोबाइलवर आलेल्या ओटीपीच्या साहाय्याने पासबूक उघडता येईल.

एसएमएसच्या माध्यमातूनही पाहता येईल पीएफ
EPFO मध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना पीएफ खात्याची माहिती 7738299899 नंबरवर EPFOHO UAN ENG असा मेसेज पाठवल्यानंतर मिळणार आहे.

मिस-कॉल देऊन चेक करा पीएएफ –
तसेच ज्यांचा नंबर ईपीएफओवर नोंदणी केलेला आहे. त्यांना 011-22901406 या नंबरवर मिस कॉल्ड केल्यास खात्यातील जमा रक्कम मेसेजद्वारे समजणार आहे.

उमंग अ‍ॅपचे फायदे –
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे अनेक सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात आली आहे. लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, पॅन, आधार, डिजिलॉकर, गॅस बुकिंग, मोबाइल बिल पेमेंट, लाइट बिल पेमेंट इत्यादी कामं करता येणार आहेत.