खुशखबर ! फक्त 1 दिवसात तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होतील PF चे पैसे, जाणून घ्या EPFO चा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे काम काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे. त्यासाठी एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) पीएफ पैसे काढणे आणखीन सुलभ करण्यासाठी नवीन यंत्रणा तयार करीत आहे. ईपीएफओ यासाठी नविन टाइम फ्रेमदेखील तयार करीत आहे. कारण एका दिवसात हजारो अर्ज येण्याची संभावना आहे.

1 दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल –
सध्या ईपीएफओ पीएफचे पैसे काढण्यासाठी प्रक्रिया अर्ज केल्याच्या 3 दिवसांच्या आत पूर्ण करते. यानंतर, बँक खात्यात पैसे पोहोचण्यासाठी 3 दिवस लागतात. थोडक्यात या पूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे एक आठवडा लागतो. ईपीएफओ आता एका दिवसात त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी करत आहे. यानंतर, जर तुम्हाला पीएफ फंडामधून आगाऊ पैसे काढायचे असतील तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.

ईपीएफओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , ईपीएफ पीएफची पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करणार आहे. याद्वारे, दाव्यांचा तोडगा काढण्याची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत लवकर पूर्ण होईल. याअंतर्गत, अर्ज भरण्याच्या दिवशी भागधारकांना दावा भरला जाईल. यासाठी ईपीएफओ नवीन प्रणाली आणणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज –
ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
लॉगिन आयडी , पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
त्यांनतर मॅनेजच्या पर्यायावर क्लीक जा आणि आपल्याकडे पीएफ खाते पूर्ण केवायसी आहे की नाही ते तपासा.
त्यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमच्या पर्यायावर क्लिक करा.

आपण या 3 पर्यायांमध्ये पैसे काढू शकता
आपण ऑनलाईन क्लेम सबमिट केल्यावर,पेमेंट पर्याय निवडावा लागेल. यामध्ये, I Want To Apply For वर जावं लागेल. EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) या pension withdrawal हे तीन पर्याय दिसतील. आपल्या सोयीनुसार आपण कोणताही पर्याय निवडू शकता. यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागेल. ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज ईपीएफओपर्यंत पोहोचेल.

Visit : Policenama.com