PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

नवी दिल्ली : PF News |कोरोना संकटात लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. नोकरी गमावणार्‍यांची सॅलरी तर बुडलीच पण पीएफ (PF News) खात्यात सुद्धा पैसे जमा होणे बंद झाले. मात्र, सरकारने अटींसह नोकरी गमावणार्‍या लोकांच्या खात्यात दोन वर्षापर्यंत पैसे देण्याची योजना बनवली होती. जेणेकरून नोकरी गमावल्यानंतर जर पुन्हा नोकरी मिळाली तर त्याचे पीएफ खाते बंद होऊ नये. या योजनेचा कालावधी 30 जूनला संपत होता, परंतु आता तो आणखी वाढवला आहे.

संघटीत क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) खात्यात केंद्र सरकार मार्च 2022 पर्यंत पैसे जमा करत राहील. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संघटीत क्षेत्रात रोजगार गमावणार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सरकारी कर्मचारी आणि कंपनीकडून दोन वर्षापर्यंत अंशदान करेल. कामगार मंत्रालयानुसार ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली जाऊ शकते.

30 जूनपर्यंत होती ही योजना
कोरोना काळात रोजगार प्रोत्साहनासाठी मागील वर्षी डिसेंबरमध्ये लागू योजनेचा कालावधी आता 30 जून 2021 आहे.
योजनेचा हेतू कंपन्यांवर नवीन कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीत अंशदानाचा भार कमी करणे होता, जेणेकरून ते जास्त रोजगार देऊ शकतील.
कामगार मंत्रालयाने सांगितले की, कालावधी वाढवल्यानंतर 21-22 च्या पर्यंत संघटीत क्षेत्रात रोजगार मिळणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना लाभ मिळेल.
सरकार यामध्ये कर्मचार्‍याच्या वेतनाच्या एकुण 24% पीएफ अंशदान देते.
ज्या कंपन्यांनी कोरोना काळात कपात केली, त्या कर्मचार्‍यांना पुन्हा बोलावले तर त्यांना सुद्धा हा लाभ मिळेल.

हे देखील वाचा

LPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही

MP Arvind Sawant । शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले – ‘बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं’

भाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन CM ठाकरेंना सूचवा’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PF News | central government will give pf contribution till march 2022 for those who lost their jobs during the corona time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update