PF New Rules | 1 एप्रिलपासून पीएफ नियमात बदल, पैसे काढताना द्यावा लागणार टॅक्स, जाणून घ्या नवीन नियम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF New Rules | कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले. याचा परिणाम अनेक उद्योग धंद्यावर (Business) झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे जमा पूंजीवर उदर्निवाह चालवण्याची वेळ अनेकांवर आली. त्यामुळे नोकरदारांचे (Employees) हुकमाचे पान असलेल्या भविष्य निर्वाह निधीवरही (Provident Fund) त्याचा ताण आला. अनेकांनी पीएफमधील रक्कम (Withdrawal) काढण्यास प्राधान्य दिले. हा सिलसिला अद्याप सुरु आहे. मात्र आता 1 एप्रिल पासून पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात (PF New Rules) बदल (Change) करण्यात आला. 1 एप्रिलपासून पीएफमधील रक्कम काढण्यावर टीडीएस (TDS) आकारला जाणार आहे.
जाणून घ्या नवीन नियम
पीएफवरील निधीसंदर्भात नवीन नियम 1 एप्रिलपासून अंमलात येणार आहे. नवीन नियमानुसार (PF New Rules) पीएफमधील निधी अडीच लाखांहून अधिक असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर (Interest) कर आकारणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळते. परंतु आता हा व्याजदर कमी करुन 8.1 टक्के करण्यात आला आहे.
पैसे काढण्यावर अनेक निर्बंध
पीएफमधून पैसे काढण्यावर आता अनेक निर्बंध (Restrictions) आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यावर कर आकारणी (Taxation) केली जाणार आहे.
तसेच नोकरीतील सेवाकाळाला पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच कर्मचाऱ्याने पीएफमधून पैसे काढले तर 10 टक्के टीडीएस आकारला जाणार आहे.
पीएफ खात्यातून (PF Account) काढून घेण्यात येणारी रक्कम 50 हजाराहून अधिक असेल तरच टीडीएस लागू होणार आहे.
टीडीएस कापला जाऊ नये यासाठी कर्मचारी 15 जी व 15 एच यापैकी एक फॉर्म भरुन देऊ शकतो. (PF New Rules)
—
… तर कोणताही कर आकारला जाणार नाही
एखाद्या कर्मचाऱ्याने ‘कायमस्वरुपी कर्मचारी’ (Permanent Employees) म्हणून नोकरीमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असेल आणि त्याने जर पीएफ मधून पैसे काढले तर त्या रकमेवर (Amount) कोणताही कर आकारला जाणार नाही.
यावेळी ‘कायमस्वरुपी कर्मचारी’ हा शब्द महत्त्वाचा आहे.
कारण कर्मचारी वर्षभरासाठी प्रोबेशन (Probation) किंवा कंत्राटी पद्धतीवर रुजू झाला आणि नंतर चार वर्षे तो कायम कर्मचारी म्हणून संस्थेत राहिल्यास नियोक्ता त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर टीडीएस आकारु शकेल.
मात्र, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी, म्हणजे कर्मचारी आजारी पडल्यास,
कंपनी बंद पडल्यास कर्मचाऱ्याने पीएफ मधून पैसे काढले तर त्यावर कर आकारणी केली जाणार नाही.
Web Title :- PF News Rules | how much tax will be charged for withdrawal of pf from 1st april learn more
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update