PF New Rules | नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF च्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल, जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF New Rules | नोकरी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देखील कर्मचारी असाल तर तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओमध्ये (EPFO) खाते असणारच. दरम्यान आता पीफ खात्यावरही कर (PF Account Tax) लागणार आहे. तुमच्या पगाराचा (Salary) काही भाग पिएफच्या नियमांमध्ये (PF New Rules) काही बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून सध्याचे जे पीएफ खाते आहे ते दोन भागात विभागले जाण्याची शक्यता आहे.
‘या’ पीएफ खात्यावर लागेल Tax
मागील वर्षी सरकारने नवीन आयकर नियम अधिसूचित (New Income Tax Rules Notified) केले होते. आता या अंतर्गत पीएफ खाती दोन भागात विभागली जातील. यामध्ये केंद्राला वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्यूशन (Employee Contributions) असल्यास पीएफ उत्पन्नावर कर आकारला जाईल. दरम्यान, नवीन नियमांचा (PF New Rules) उद्देश उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना सरकारी कल्याणकारी योजनेचा (Government Welfare Scheme) लाभ घेण्यापासून रोखणे हा आहे.
PF नियमांचे प्रमुख मुद्दे
– सध्याच्या पीएफ अकाऊंट्सला करपात्र आणि करपात्र नसलेल्या कॉन्ट्रिब्युशन खात्यामध्ये (Contribution Account) विभागली जातील
– करपात्र नसलेल्या खात्यामध्ये त्यांचे क्लोजिंग अकाउंट (Closing Account) देखील समाविष्ट असेल, कारण त्याची तारीख 31 मार्च 2021 आहे.
करदात्यांना बसणार फटका?
दरम्यान, हा नियम लागू झाल्यानंतर, बहुतेक पीएफ ग्राहकांना 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेचा फायदा होईल. परंतु लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार नाही. याच प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. म्हणजे तुमचा पगार कमी किंवा सरासरी असेल, तर तुम्हाला या नवीन नियमात काहीही फरक पडणार नाही.
Web Title :- PF News Rules | pf new rules pf accounts to be split into two from 1 april 2022 EPFO
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्यांचे हात-पाय तोडा, 2-4 महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता’