सरकारने नोकरदारांना दिला मोठा दिलासा, PF मधून पैसे काढण्यासाठी नाही मागितली जाणार ‘ही’ कागदपत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सांगितले की, ईपीएफ सदस्याला कोविड-१९ महामारीशी संबंधित दावा दाखल करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना महामारीमध्ये रोकड लागल्यास आपण सहज पीएफमधून पैसे काढू शकता. कोरोना संकटात ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफमधून ३ महिन्यांच्या पगाराची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ट्विट करून ही माहिती दिली. ईपीएफओने ट्वीटमध्ये म्हटले की, महामारी-‘कोविड-१९ प्रकोपा’शी संबंधित दावा दाखल करण्यासाठी ईपीएफ सदस्याला कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र देणे आवश्यक नाही.

याव्यतिरिक्त, ईपीएफओने सर्व ग्राहकांना ईपीएफओच्या सोशल मीडिया हँडल्सची सदस्यता घेण्यापूर्वी सोशल मीडिया हँडल्सची पूर्णपणे तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने म्हटले की, अशी खाती फॉलो करू नका. आमच्या अधिकृत हँडल्सशी कनेक्ट रहा.

फेसबुक- @socialepfo
ट्विटर- @socialepfo
युट्युब- @Employees’ Provident Fund Organitsation

ऑनलाईन EPF ट्रान्सफर करा
ईपीएफओ पीएफ हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील प्रदान करते. मात्र युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आल्यापासून कर्मचार्‍याची सर्व खाती एकाच ठिकाणी राहतात. पण पैसे वेगवेगळ्या खात्यात असतात. म्हणून आपण प्रथम आपला युएएन नवीन कंपनीसह शेअर करणे महत्वाचे आहे. नंतर जुन्या खात्यातून आपल्या नवीन खात्यात पैसे ट्रान्सफर करा. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी आपल्याला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • असे करा पीएफ ट्रान्सफरसाठी अप्लाय?
  • सर्वप्रथम ईपीएफओ https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ च्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर जा. तिथे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यावर ऑनलाईन सर्व्हिसेसवर जा आणि Member-One EPF Account Transfer Request पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपण आपल्या वर्तमान नियुक्तीची वैयक्तिक माहिती आणि पीएफ खाते व्हेरिफाय करा.
    त्यानंतर Get Details वर क्लिक करा. मागील नियुक्तीचा पीएफ खात्याचा तपशील स्क्रीनवर येईल.
  • आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मला ऍटेस्ट करण्यासाठी आधीचा नियोक्ता आणि सध्याचा नियोक्ता यांच्यातील एकाची निवड करण्याचा पर्याय असेल. आपण अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग
  • डीएससीच्या उपलब्धतेच्या आधारावर हे निवडा. दोघांपैकी कोणाही एकाला निवडा आणि सभासद यूएएन द्या.
  • सर्वात शेवटी Get OTP पर्यायावर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. मग तो ओटीपी एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेची विनंती मागील कंपनीला जाईल.
  • ही प्रक्रिया पुढील तीन दिवसांत पूर्ण होईल. प्रथम कंपनी ते हस्तांतरित करेल. नंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. ईपीएफओ अधिकाऱ्याच्या पडताळणीनंतरच तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील.