PF अकाऊंटमधून आपलेच पैसे काढताना द्यावा लागतो Tax, जाणून घ्या ‘या’ नियमाबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीसाठी पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचे पैसे खूप महत्वाचे असतात. कोणतेही महत्वाचे कारण असल्याशिवाय लोक ते पैसे काढत नाहीत, परंतु जर काही कारणास्तव नोकरी गमावली तर काही काळानंतर आपण पीएफचे पैसे काढू शकता. दरम्यान, पैसे काढण्याशी संबंधित नियमांबद्दल काही लोकांनाच माहिती आहे. ज्यामुळे त्यांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागते. यासाठी असे काही नियम आहेत ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल.

नोकरी बदलल्यास कर्मचार्‍याचा ईपीएफ दुसर्‍या मालकाकडे ट्रान्सफर केला जातो. अश्या परिस्थिती, कर्मचाऱ्याचा कंटिन्यूयस पीरियड कॅल्क्युलेट करताना, नवीन नियोक्ताची मुदत देखील जोडली जाईल. तसेच, जर एखादा कर्मचारी 5 वर्षांच्या मुदतीआधी आपला पीएफ काढत असेल तर त्याला ईपीएफ काढताना कर भरावा मागतो. मात्र, जर कर्मचात्याची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला नोकरी गमावली असेल. किंवा नियोक्ता (कंपनी) ने व्यवसाय बंद केला आहे. अश्या काही प्रसंगी पीएफमधून पैसे काढल्यास कर द्यावा लागत नाही.

1) ईपीएफच्या नियमांनुसार एखादा सदस्य नोकरी सोडल्यानंतर एका महिन्यानंतर नोकरीच्या वेळी जमा झालेल्या रकमेपैकी 75% रक्कम काढू शकतो. जर ती व्यक्ती दोन महिन्यांहून अधिक काळ बेरोजगार राहिली तर ती संपूर्ण रक्कम पीएफ खात्यातून काढू शकेल.

2) आयकर कायद्यानुसार पाच वर्षांच्या आत ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यास कर आकारला जातो. या रकमेवरील आयकर तुमच्या अस्तित्त्वात असलेल्या स्लॅबनुसार द्यावा लागतो. मात्र, जर आपण एका नियोक्ता (कंपनी) बरोबर पाच वर्षे काम केले असेल आणि पाच वर्षे ईपीएफमध्ये योगदान दिले असेल तर या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच ज्या वर्षी तुम्ही पीएफ खात्यात योगदान दिले त्या वर्षी तुमच्या एकूण उत्पन्नाला लागू असलेल्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागतो.

3) कोणत्या प्रसंगी पीएफवर कर भरणे आवश्यक –
पीएफच्या योगदानाचे चार घटक आहेत – कर्मचा-यांचे योगदान, मालकाद्वारे जमा केलेली रक्कम आणि दोन्हीवर व्याज. या चारपैकी तीनवर आपल्याला कर भरावा लागेल – मालकाचे योगदान, आपल्या योगदानावरील व्याज आणि मालकाच्या योगदानावरील व्याज.

4)  जर पाच वर्षांपूर्वी पीएफ खात्यातून रक्कम काढली गेली असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. अशा परिस्थितीत आपल्याला ईपीएफच्या चारही घटकांवर कर भरावा लागेल. या रकमेवरील कर तुम्ही दरवर्षी पीएफ खात्यात जमा केला त्यानुसार मोजला जाईल. महत्वाचे म्हणजे आपल्या पीएफमधील गुंतवणूकीवरील कर मोजणी यावरही अवलंबून आहे कि, तुम्ही त्यावर्षी आयटीआर दाखल करताना आपण आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कपातीचा लाभ घेतला आहे की नाही.

5)  प्राप्तिकर कायद्यानुसार आपण पीएफमध्ये रक्कम जमा केल्यास तुमच्या योगदानास आयकरात सूट दिली जाते. जर यावेळी आपले उत्पन्न शून्य असले तरीही, आपल्याला पीएफ खात्यातून पैसे काढताना प्राप्तिकर भरावा लागेल. यामागचे कारण असे आहे की ज्या वर्षी पीएफचे योगदान दिले गेले त्या वर्षी आपले आणि आपल्या मालकाचे कर कमी झाले होते.