EPFO नं सोपं केलं अकाऊंट मधून ‘पैसे’ काढणं आणि ‘ट्रान्सफर’ करण्याचे ‘नियम’, आता घरबसल्या करा ‘Date of Exit’
नवी दिल्ली : वृत्त संस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO – Employees Provident Fund Organization) नोकरी करणार्यांसाठी दिलासा देत एक मोठा नियम सोपा केला आहे. ईपीएफओने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने आपल्या सिस्टमला आणखी सोपे केले आहे. यापूर्वी नोकरी सोडल्याची तारीख (Now Employee’s can also update their Date of exit) नसल्याने पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे अडकून रहात होते. आता भविष्य निर्वाह निधी संघटनेने हे टेन्शन दूर करण्यासाठी युनिफाईड पोर्टलवर एक नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत कर्मचारी मागील कंपनी सोडल्याची तारीख स्वत: अपडेट करू शकतो.
जेव्हा एखादा व्यक्ती कंपनीत काम करणे सुरू करतो तेव्हा त्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम त्याच्या सॅलरीमधून कापली जाते आणि तेवढेच योगदान कंपनीकडून दिले जाते. व्यक्तीच्या सॅलरीच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा होते. तर कंपनीद्वारे केलेले योगदान केवळ 3.67 टक्के यामध्ये जमा होते. उर्वरीत रक्कम 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे ईपीएसमध्ये जमा होते.
आता स्वत: टाकू शकता नोकरी सोडण्याची तारीख
ईपीएफओने आपल्या खातेधारकांसाठी एक ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ईपीएफ अकाउन्ट होल्डर नोकरी सोडण्याची तारीख स्वत: अपडेट करू शकतो. म्हणजे कर्मचारी ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये सांगू शकतो की त्याने आपली कंपनी कधी सोडली.
हा नियम बदलल्याने काय होणार
तज्ज्ञ सांगतात की, यापूर्वी ही तारीख केवळ कंपनी अपडेट करू शकत होती. जर ईपीएफओ रेकॉर्डमध्ये कंपनीने नोकरी सोडण्याची तारीख नोंद केली नाही तर ईपीएफ खातेधारक आपल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू किंवा ट्रान्सफर करू शकत नव्हता. आता ही अडचण दूर झाली आहे.
ऑनलाइन ईपीएफओमध्ये कशी नोंद कराल Exit Date
ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, एक्झिट डेट अपडेट करण्यासाठी खातेधारकाला ई-सेवा पोर्टलवर जाऊन अपडेट करावे लागेल. जाणून घेवूयात याची सर्व प्रक्रिया…
(1) सर्वात आधी तुम्हाला यूनिव्हर्सल अकाउन्ट नंबर (यूएएन), पासवर्ड आणि कपाचा कोड टाकून ई-सेवा पोर्टलवर लॉग-इन करावे लागेल. परंतु, यासाठी तुमचे यूएएन पोर्टल अॅक्टिवेट असले पाहिजे.
(2) लॉग-ईन नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करा. यानंतर मार्क एक्झिट ऑपशनवर क्लिक करा.
(3) असे करताच आपल्या स्क्रीनवर एक नवी टॅब उघडले. एम्लॉयर (नोकरी करत असलेली कंपनी) आणि ते ईपीएफ अकाउन्टला निवडा ज्यासाठी एक्झिट डेट अपडेट करायचे आहे. कंपनीच्या अंतिम कॉन्ट्रिब्यूशननंतर एक्झिटची तारीख केवळ दो महिन्यानंतरच नोंद केली जाऊ शकते. एक्झिट डेट टाकताना तुम्ही कोणतीही तारीख अंकित करू शकता, ज्यामध्ये कॉन्ट्रिब्यूशन केले गेले आहे. ईपीएफओच्या पासबुक रेकॉर्डमध्ये तुम्ही ती पाहू शकता. सोबतच, नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण नोंद करू करा.
(4) यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल. हा ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाका.
(5) अपडेटवर क्लिक केल्यानंतर ओके वर क्लिक करा. तुमच्या ईपीएफओ रेकॉर्डमध्ये एक्झिट डेट दिसू लागेल. एक्झिट डेट अपडेट झाली किंवा नाही यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मेंबर ई-सेवा पोर्टलमध्ये लॉग-इन करावे लागेल.
(6) यानंतर तुम्हाला व्ह्यू टॅबवर क्लिक करून सर्व्हिस हिस्ट्री सिलेक्ट करावी लागेल. तुमच्या स्क्रीनवर नवीन टॅब उघडेल. वेबपेजमध्ये त्या सर्व संस्थांची यादी दिसेल ज्यांच्या सोबत तुमचे ईपीएफ अकाउन्ट होते. यामध्ये जॉयनिंगची तारीख, ईपीएफमधून एक्झिटची तारीख, ईपीएसमध्ये जॉयनिंगची तारीख इत्यादी माहिती असते.