PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF Withdrawal | खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍यासाठी पीएफ खाते ही मोठी गोष्ट आहे. त्याच्या पगारातून जो भाग कापला जातो आणि त्यात टाकला जातो, तो निवृत्तीनंतर उपयोगी तर असतोच, पण अचानक गरजांसाठीही तो खूप उपयोगी ठरतो. (PF Withdrawal)

 

मात्र, तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे किंवा दुसर्‍या चालू खात्यात हस्तांतरित करणे हे बँक खात्यातून पैसे काढण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. पण काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम सहज पूर्ण करू शकता.

 

खात्यातून काढू शकता इतकी रक्कम
यापूर्वी, निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी करण्यासाठी आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीएफचे पैसे काढता येत होते, परंतु कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. तसेच, आता खातेदार त्याच्या खात्यातून पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतो.

 

मात्र, त्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोकरी करत असताना तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकत नाही. नियमांनुसार, कोणताही खातेदार पीएफ खात्यातून तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा एकूण जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम काढू शकतो. यापैकी जे कमी असतील तेवढे पैसे काढता येतात. (PF Withdrawal)

ऑनलाइन क्लेम करण्याचे फायदे
जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि तुम्हाला या कामासाठी पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर ऑनलाइन क्लेम करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

 

याचे मोठे कारण म्हणजे ऑनलाइन दावेदारांना हे पैसे तीन दिवसांत बँक खात्यात जमा होतात. जे ऑफलाइन दावा करतात त्यांना सुमारे 20 दिवस प्रतीक्षा करावी लागते. घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून पीएफचे पैसे कसे काढू शकता ते जाणून घेवूयात…

 

PF काढण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

ऑनलाइन पैसे काढण्यासाठी पीएफ खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असावे.

खातेधारकाचा UAN क्रमांक अ‍ॅक्टिव्ह असावा.

UAN क्रमांक आधारशी जोडलेला असावा.

बँक तपशील आणि IFSC कोड देखील UAN क्रमांकाशी जोडलेला असावा.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पैसे काढू शकता

1- EPFO च्या मेंबर पोर्टलवर जाऊन, प्रथम मेनूमधील सर्व्हिस पर्यायावर क्लिक करा आणि नंतर फॉर इम्प्लॉइजवर क्लिक करा.

2- आता नवीन पृष्ठावरील Member UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लिक केल्यास लॉगिन पेज ओपन होईल.

3- येथे तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा आणि नवीन पेज उघडल्यावर ऑनलाइन सर्व्हिसवर जा.

4- यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधून CLAIM (FORM-31, 19 & 10C) निवडा. यानंतर आणखी एक नवीन पेज उघडेल.

5- येथे तुमचा बँक खाते क्रमांक व्हेरिफाय करावा लागेल, त्यानंतर Certificate of Undertaking उघडेल, जे अ‍ॅक्सेप्ट करा.

6- आता दिसत असलेल्या Proceed for Online Claim पर्यायावर क्लिक करा. असे करताच एक फॉर्म उघडेल.

7- येथे I want to apply for समोरील ड्रॉपडाऊनमधून PF ADVANCE (फॉर्म – 31) निवडा.

8- यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि रक्कम विचारली जाईल, तुम्ही चेकबॉक्स मार्क करताच प्रोसेस पूर्ण होईल.

9- या प्रोसेसचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला EPFO कडून एक रेफरन्स नंबर मिळेल.

10- आता या रेफरन्स नंबरच्या मदतीने तुम्ही पीएफ खात्यातून दावा केलेल्या रकमेचे स्टेटस तपासू शकता.

 

Web Title :- PF Withdrawal | pf withdrawal rule online claim know all process in 10 points here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’; आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक शब्दात टीका

 

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात रविवारी वीजपुरवठा बंद राहणार

 

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त रिचार्ज, 1 महिन्यापर्यंत फ्रीमध्ये होईल Calling आणि मिळेल Data