PF ची रक्‍कम काढणं झालं ‘अवघड’, ‘या’ नियमांत झाला मोठा बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF फार महत्वाचा असतो. संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये सामावलेली असते. त्यामुळे आता यापुढे हि रक्कम काढण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागणार आहेत.

PF का पैसा निकालना अब आसान नहीं! बदल चुका है ये नियम

ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर याआधी तुम्हाला हि रक्कम मिळत असे. मात्र यापुढे यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे. खात्यातून तुम्हाला आगाऊ रक्कम काढण्यासाठी बँकेचे पासबुक स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे. याआधी हि पद्धत वापरावी लागत नसे.

PF का पैसा निकालना अब आसान नहीं! बदल चुका है ये नियम

या पद्धतीने काढा पैसे –

1) सर्वात आधी तुम्हाला यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जावे लागेल.
2) या ठिकाणी तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच युएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
3) त्यानंतर होमपेजवर ऑनलाईन सर्व्हिस कॅटेगरी येईल.
4) त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार क्रमांक टाकून व्हेरिफाय करायचे आहे.

PF का पैसा निकालना अब आसान नहीं! बदल चुका है ये नियम

5) त्यानंतर प्रोसिड फॉर ऑनलाइन क्‍लेमवर क्लिक करायचे आहे.
6) त्यावरील क्लेम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रक्कम, पत्ता आणि पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागणार आहे.
7) त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर तुम्ही तो व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला हवी असलेल्या रकमेची प्रोसेस सुरु होईल.

PF का पैसा निकालना अब आसान नहीं! बदल चुका है ये नियम

आरोग्यनामा ऑनलाइन –