PFI Ban | शिंदे- फडणवीस सरकार रझा अकादमीवर बंदी घालण्याची शक्यता, केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राज्यात हालचाली

मुंबई : PFI Ban | देशविरोधी कृत्य केल्याचे पुरावे सापडल्याचे सांगत केंद्र सरकारने (Central Government) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर बंदी (PFI Ban) घातली आहे. यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आणखी एका संघटनेवर बंदी घालण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. नवरात्रोत्सवानंतर (Navratri Festival) राज्य सरकार (State Government) रझा अकादमी या संघटनेवर (Raza Academy Organization) बंदी घालू शकते, असे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
हे बंदीबाबत नवरात्रोत्सवानंतर निर्णय जाहीर करू शकतात.
रझा अकादमीवर बंदी येणार, असे ट्विट सोशल मीडियावर भाजप (BJP) समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या समीत ठक्कर (Samit Thakkar) यांनी केले आहे.
ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

समीत ठक्कर यांनी महाविकास आघाडीचे सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
आणि नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
या प्रकरणी ठक्कर तुरुंगात होते. हायकोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. (PFI Ban)

यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सुद्धा रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करत राज्यातील हिंसाचारामागे रझा अकादमी असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, 1978 मध्ये अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी रझा अकादमीची स्थापना केली होती.
नूरी हे 1986 पासून रझा अकादमीचे अध्यक्ष आहेत.

रझा अकादमीद्वारे इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतर सुन्नी विद्वानांची पुस्तके प्रकाशित करण्यात येतात.
अकादमीने आतापर्यंत उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके प्रकाशित केली आहेत.
रझा अकादमी ही आंदोलनांमुळेही चर्चेत आली आहे.

11 ऑगस्ट 2012 रोजी, रझा अकादमीने आसाममधील दंगली आणि म्यानमारमधील मुस्लिमांवरील हल्ल्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे इतर काही मुस्लिम गटांसह आंदोलन केले होते.
या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला होता. यात दोन ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले होते.
काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या दंगलीतही रझा अकादमीचा हात असल्याची चर्चा होती.

रझा अकादमीने संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rehman) आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी
यांच्याविरुद्ध मुहम्मदवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला होता. तसेच इतर काही मुदद्यांवर रझा अकादमीने घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली आहे.

Web Title :- PFI Ban | pfi ban updates maharashtra government likely ban on raza academy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई, भेसळयुक्त गूळाचा साठा जप्त

Shivajirao Adhalarao Patil | ‘मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं’, आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात