CAA च्या विरोधात आंदोलन करण्यासाठी PFI ने केली होती 134 कोटी रूपयांची ‘फंडिंग’, कपिल सिब्बल, इंदिरा जयसिंह यांना देखील दिले पैसे ?

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण यंत्रणा प्रवर्तन संचालनालयाने (ED) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएएविरोधात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनने १३४ कोटींचा निधी दिला आहे. एजन्सीने पीएफआयशी संबंधित काही प्रकरणांची नुकतीच चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच वेळी पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनशी संबंधित सुमारे ७३ बँक खाती मिळाली, ज्यामुळे निषेधाच्या वेळी संशयास्पद प्रमाणात मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला.

बड्या वकिलांना पैसे दिले
देशातील अनेक बड्या वकिलांना पीएफआयच्या बँक खात्यातून पैसे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये कपिल सिब्बल आणि इंदिरा जयसिंग यांची नावे आहेत. दोन ते तीन दिवसांत १२० कोटी रुपये जमा झाले आणि ते त्वरित काढून घेण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. पीएफआय कडून आणखी बड्या वकिलांना पैसे पाठविले गेले. एका वृत्तसंस्थे मध्ये या तपासणीशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.

मागील दिवसांत उत्तर प्रदेश सरकारने हिंसक निदर्शनांसाठी पीएफआय बंदी घालण्याची मागणी केली होती. सीएएविरोधात यूपीमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनामागील पीएफआयचा हात असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह म्हणाले होते की पीएफआयच्या 25 सदस्यांना राज्यातील अनेक भागात दंगा आणि तोडफोड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

धोकादायक संघटनेचा PFI ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) बद्दल सांगितले जाते की ही एक कट्टरपंथी इस्लामिक संघटना आहे. याबद्दल काही खळबळजनक खुलासे झाले आहेत. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी संघटनेच्या ISIS आणि सिमीशी संपर्क शोधत आहे. एजन्सींना काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. पीएफआय बद्दल असे म्हटले जाते की त्याचे केरळ मॉड्यूल ISIS साठी काम करत होते. तेथून त्याचे सदस्य सिरिया आणि इराकमध्ये ISIS मध्ये सामील झाले.