PFI On MNS Chief Raj Thackeray | ‘पीएफआय’ची राज ठाकरेंना धमकी?, म्हणाले – ‘छेडोगे तो छोडेंगे नही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PFI On MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे (Loudspeaker On Mosque) उतरवण्यासाठी 3 मे पर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर जर मशिदींवर भोंगे राहिले तर त्या ठिकाणी मोठ्या आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा, असे आदेश त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना (MNS Workers) दिले आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी टीका केली. त्यानंतर आता मुंब्रा (Mumbra) येथील पीएफआय संघटनेने राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे अशा शब्दात पीएफआय Popular Front of India (PFI) या संघटनेने धमकी दिली आहे. (PFI On MNS Chief Raj Thackeray)

 

पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेख (PFI Mumbra Chief Mateen Shaikh) म्हणाले की, मध्ये प्रदेश तसेच इतर राज्यात रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा निघाल्या. त्यावेळी जो हिंसाचार झाला त्याला आमचा विरोध आहे. मुस्लिमांवर अन्याय होत असून मुंब्य्रातील वातावरण बिघडवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे आमचे घोषवाक्य आहे. मशिदींवरील एकाही भोंग्याला हात लावला तर सर्वात आधी पीएफआय समोर असेल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, आंदोलन संपल्यानंतर पीएफआयने मुंब्रा पोलिसांना (Mumbra Police) निवेदन दिले.

 

आज हनुमान जयंती आहे. विविध ठिकाणी मनसेकडून हनुमान चालीसा पठण केली जाणार आहे.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात संध्याकाळी सार्वजनिक हनुमान चालीसा पठणामध्ये सहभागी होणार आहेत.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray Mumbra Popular Front of India (PFI) Threatens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा