PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PFI | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Pune Collector Office) काही युवकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ (Pakistan Zindabad Slogan) आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली असा दावा होत आहे. त्यासंदर्भात एक व्हिडिओ पण प्रचंड व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात (Popular Front of India (PFI) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आदोलकांकडून यावेळी ‘पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद, पीएफआय जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या, असा दावा पुणे पोलिसांनी (Pune Police) केला आहे. आदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा (FIr) दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी झालेली नाही.

 

 

शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या (Popular Front of India)  समर्थकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘PFI जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. पण एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाला. PFI  संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळीचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक विविध घोषणा देताना दिसत आहेत.

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे (Bund Garden Police Station) पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Police Inspector Pratap Mankar) यांनी सांगितले की, काल पुणे शहरात PFI  संघटनेच्या समर्थकांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. तरीही या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवला होता. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ 41 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

 

रिजाज जैनुद्दीन सय्यद Rijaz Zainuddin Syed (वय-26 रा. शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द)
याच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीसी 141, 143, 145, 147, 149, 188, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायदा
(Maharashtra Police Act) 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- PFI | pfis-agitation-does-not-contain-slogans-of-pakistan-zindabad-disclosure-of-pune-police-bundgarden sr pi pratap mankar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ashish Shelar | खडसे-अमित शाह यांच्या भेटीवर आशिष शेलारांचे मोठे विधान, म्हणाले… (व्हिडिओ)

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार