आता ‘आधार’ बेस्ड KYC नं उघडता येईल NPS अकाऊंट, ‘फिजिकल’ डॉक्यूमेंटची नाही गरज

नवी दिल्ली : पेन्शन फंड रेग्युलेटर पीएफआरडीएने म्हटले की, नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत खाते उघडणे सोपे केले आहे. या अंतर्गत नवीन सबस्क्रायबर्ससाठी नो युअर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया पेपरलेस केली आहे. आता केवळ ऑफलाइन आधारसोबत खाते उघडले जाऊ शकते आणि फिजिकल प्रत देणे आवश्यक नाही. पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) ने म्हटले की, त्यांनी ई-एनपीएस/पॉईंट ऑफ प्रझेन्स केंद्रांना (जेथे एनपीएस खाते उघडले जाते) संभाव्य अंशधारकांच्या सहमतीसोबत ऑफलाइन आधारद्वारे एनपीएस खाते उघडण्यास परवानगी दिली आहे.

युआयडीएआय पोर्टलवरून डाऊनलोड करू शकता आधार फाईल

ऑफलाइन आधारसोबत पेपरलेस व्हेरिफिकेशनने फिजिकल रूपाने 12 अंकाच्या ओळखपत्राची प्रत देण्याची गरज नाही. नव्या प्रक्रियेअंतर्गत अर्जदार युआयडीएआयच्या पोर्टलवर जाऊन ई-एनपीएसद्वारे पासवर्ड सुरक्षित आधार एक्सएमएल फाईल डाऊनलोड करू शकता. केवायसीसाठी ती देता येईल. या सुविधेचा लाभ पॉईंट ऑफ प्रझेन्सद्वारे एनपीएस खाते उघडू शकता.

ताबडतोब उघडू शकता अकाऊंट

याची केवायसी माहिती एक्सएमएल फाईलच्या रूपात असते. ज्यावर यूआयडीएआयचे डिजिटल हस्ताक्षर असते. याद्वारे ईएनपीएस/पीओपी तपासणी आणि सत्यता पडताळू शकतात. यामाध्यमातून एनपीएस खाते तात्काळ उघडले जाऊ शकते. तसेच अंशधारक त्यामध्ये तोबडतोब पैसे टाकू शकतात.

एनपीएसबाबत बदलला नियम
पीएफआरडीए नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) सबस्क्रायबर्ससाठी डायरेक्ट रेमिटन्स नावाची नवी भरणा पद्धत सुरू करत आहेत. एनपीएस कॉन्ट्रीब्यूशन्सच्या नव्या मोडने एनपीएस सकस्क्रायबर नेट बँकिंगद्वारे सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट स्थापित करू शकतील. ज्याद्वारे एनपीएसमध्ये पीरियॉडिकल आणि रेग्युर कंट्रीब्यूशन करता येईल. कोणीही व्यक्ती थेट कोणाच्याही बँक खात्याची नेट बँक सुविधेतून एनपीएसमध्ये गुंतवणुक करू शकते. डी रेमीट मोडमध्ये एनपीएस कंट्रीब्यूशन ऑनलाईन भरणा नि:शुल्क आहे.