PFRDA रिटायरमेंटनंतर 40 % रक्कम पेन्शन फंड मॅनेजर्सकडे ठेवण्याचा सरकारचा विचार; जाणून घ्या काय होणार फायदा?

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  भारतीय पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) रिटायरमेंटनंतर 40 टक्के रक्कम पेन्शन फंड मॅनेजर्सकडे ठेवण्याचा विचार करत आहे. आत्तापर्यंत रिटायरमेंटवेळी 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकाला विमा कंपन्यांकडून प्रस्तावित एन्यूटी खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर उर्वरीत 60 टक्के रक्कम सरळ काढता येऊ शकते.

रिटायरमेंटवेळी मिळणारी रक्कम 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला एन्युटी खरेदी करणे बंधनकारक नसणार आहे. कारण मासिक पेन्शन स्वरूपात दिली जाणारी रक्कम खूप कमी असणार आहे. सध्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये रक्कम जास्त कालावधीपर्यंत जमा होत आहे. 60 वर्षीय व्यक्तीच्या रिटायरमेंटनंतर व्यक्तीचे एन्युटी खरेदी करण्यासाठी 40 टक्के रक्कम द्यावी लागते तर उर्वरीत 60 टक्के रक्कम सरळ काढता येऊ शकते.

PFRDA च्या NPS, APY, योजनांच्या अंशधारकांची संख्या 23 टक्के वाढणार

PFRDA ने NPS आणि APY सारख्या प्रमुख योजनांमधील अंशधारकांची संख्या 31 मार्च, 2021 च्या आर्थिक वर्षात 23 टक्क्यांनी वाढून 4.24 कोटींवर पोहोचली आहे. खातेदारांची संख्या सुमारे 23 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे मागील वर्ष आव्हानात्मक राहिले.